ब्रह्मपुरीत दहा लाखांचा दारुसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:20+5:30
ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील डीबी पथकांनी बेलपत्री ते जुगणाळा रोड हनुमान मंदिर जवळ नाकाबंदी केली. यावेळी एका वाहनातून १४ पेट्या दारुसह सात लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. यावेळी वाहनचालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. तर कुर्झा चौकाजवळ देवेंद्र पंढरी रंगारी आपल्या घरासमोर चारचाकी वाहनातून देशी दारुची विक्री करीत असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी धाड टाकली.

ब्रह्मपुरीत दहा लाखांचा दारुसाठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : पोलिसांनी दोन ठिकाणी नाकाबंदी करुन केलेल्या कारवाईत दहा लाख ५५ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.
ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील डीबी पथकांनी बेलपत्री ते जुगणाळा रोड हनुमान मंदिर जवळ नाकाबंदी केली. यावेळी एका वाहनातून १४ पेट्या दारुसह सात लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. यावेळी वाहनचालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. तर कुर्झा चौकाजवळ देवेंद्र पंढरी रंगारी आपल्या घरासमोर चारचाकी वाहनातून देशी दारुची विक्री करीत असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन एमएच ३१ सीआर ४८९९ या वाहनातून देशी दारुच्या १२ खरड्यांच्या खोक्यामध्ये सुमारे १ लाख १५ हजार २०० रुपयांची दारु जप्त केली.
दोन्ही कारवाईत सुमारे दहा लाख ५५ लाख २०० रुपयांचा दारुसाठा जप्त करुन एकाला अटक केली आहे. दोन्ही कारवाई ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस खोब्रागडे, मुकेश, योगेश, अजय नागोसे, अजय कताईत, चिकराम दुसरी कारवाई पोलीस उपनिरिक्षक अख्तर सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल संदेश देवगडे, पोकॉ नितीन भगत आदींनी केली.
बल्लारपुरात साडे सोडा लाखांचा मुद्देमाल जप्त
बल्लारपूर : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर डीबी पथकाने सातखोली परिसरातील,जीएन कॉलेजजवळ पीकअप गाडीची तपासणी करुन ८५ खर्ड्याच्या खोक्यातून अंदाजे १२ लाख ७५ हजार रुपयांची दारु व चार लाख रुपयांचे पीक अप वाहन असा एकूण १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अब्दुल करीम शेख उर्फ छोटे, ख्वाजा शेख उर्फ बडे, आणि वाहन चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.