दहा लाखांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST2020-12-29T04:27:24+5:302020-12-29T04:27:24+5:30

वरोरा : पोलिसांनी खांबाडा मार्गावर कारवाई करुन ४० पेट्या देशी दारु व वाहन असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ...

Ten lakh worth of liquor seized | दहा लाखांचा दारुसाठा जप्त

दहा लाखांचा दारुसाठा जप्त

वरोरा : पोलिसांनी खांबाडा मार्गावर कारवाई करुन ४० पेट्या देशी दारु व वाहन असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. नदीम रहीम खान (२४) रा. यास्मिन नगर, अमरावती, गजानन भीमराव पवार (४०) रा. महेंद्र कॉलनी अमरावती असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.

चारचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी खांबाडा मार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या पीकअप क्रमांक एमएच २७ बीएक्स ५००३ या वाहनाची तपासणी केली. वाहनामध्ये ९० मिलीच्या ४० पेट्या देशी दारू आढळून आली. पोलिसांनी सर्व दारु व वाहन असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, विलास बल्की, नापोशी किशोर बोढे, कपिल भांडारवार, सुरज मेश्राम, विशाल गीमेकर, दिनेश मेश्राम, महेश बोलगोडवार आदींनी केली.

Web Title: Ten lakh worth of liquor seized