लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : येथील नवनिर्मित संकटमोचन हनुमान मंदिराच्या वतीने सोमवारी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या मिरवणुकीने राजुरा शहर दुमदुमले.मंदिराच्या परिसरात भव्य शामियाना उभारला असून हा पाच दिवशीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या आयोजनामुळे राजुरा नगरीत भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली आहे. रस्त्याच्या चौफेर फलक, स्वागत कमान उभारले आहेत. शहरातील मुख्य मार्गांनी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने अनेक मनमोहक देखाव्यांचे सादरीकरण केले होते. आदर्श मराठी प्राथमिक शाळा, शिवाजी विद्यालय राजुरा, सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल, विविध महिला मंडळ, धार्मिक मंडळासह हजारो नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.शोभायात्रेमध्ये आमदार अॅड. संजय धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, रिपब्लिकन आॅफ इंडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम अडानिया, भारतीय जनता पक्षाचे राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, नगरसेवक हरजित सिंग, आनंद दासरी, गजानन भटारकर, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पिपरे, नगरसेवक राजू डोहे, मुख्य आयोजक माजी नगरसेवक गजेंद्र झंबर, गोपाल झंवर, लोकमत सखी मंचच्या संयोजिका जयश्री देशपांडे, कृतिका सोनटक्के, संध्या पत्तेवार, माजी नगराध्यक्ष विलास बोनगिरवार आदी सहभागी होते.
हनुमान मंदिराच्या शोभायात्रेने राजुरा नगर दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:49 IST
येथील नवनिर्मित संकटमोचन हनुमान मंदिराच्या वतीने सोमवारी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या मिरवणुकीने राजुरा शहर दुमदुमले.
हनुमान मंदिराच्या शोभायात्रेने राजुरा नगर दुमदुमले
ठळक मुद्देलोकमत सखी मंचतर्फे मनमोहक देखावे : शहरातील हजारो नागरिकांचा शोभायात्रेत सहभाग