अन् दिव्यांगांच्या चेह-यावर फुलले आनंदाश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:08+5:302020-12-28T04:15:08+5:30

दिलीप बोढाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग महिलाश्रमास आर्थिक मदत चंद्रपूर : प्रा. दिलीप पांडुरंगजी बोढाले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त तनुजा बोढाले ...

Tears of joy flowed on the faces of the cripples | अन् दिव्यांगांच्या चेह-यावर फुलले आनंदाश्रू

अन् दिव्यांगांच्या चेह-यावर फुलले आनंदाश्रू

दिलीप बोढाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग महिलाश्रमास आर्थिक मदत

चंद्रपूर : प्रा. दिलीप पांडुरंगजी बोढाले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त तनुजा बोढाले यांच्यातर्फे येथील दिव्यांग महिलाश्रमास नुकतीच आर्थिक मदत देण्यात आली. तनुजा बोढाले यांच्या मदतीमुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू फुलले.

तनुजा बोढाले यांचे पती प्रा. दिलीप बोढाले यांचा २०१० रोजी आकस्मिक मृत्यू झाला. तेव्हापासून त्यांच्या स्तृतिदिनानिमित्त दरवर्षी अनाथाश्रम, वृद्धाश्रमात निराधारांना मदत करून आधार देत असतात. तेव्हापासून सामाजिक कार्यातही त्यांनी विशेष कार्य सुरू केले. त्यांनी आपल्या पतीच्या स्मृतिदिनी निराधार, गरीब, गरजू दिव्यांग महिलांना स्वबळावर उभे करण्याचे कार्य करणाऱ्या दिव्यांग महिलाश्रमास आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जोपासत संस्थेस आर्थिक मदत केली.

या कार्यक्रमाला तनुजा बोढाले, दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मानलवार, उपाध्यक्षा प्रा. ज्योती राखुंडे, मयंक बोढाले, कुंदन खोब्रागडे, देवराव चौधरी, चंदा कामरे, गीता खारकर आदींसह संस्थेतील दिव्यांगांची उपस्थिती होती

Web Title: Tears of joy flowed on the faces of the cripples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.