शिक्षक संघटनांनी असाच स्नेह कायम ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:34+5:302021-03-17T04:28:34+5:30

अल्का आत्राम : शिक्षक संघटनातर्फे सत्कार चंद्रपूर : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी,पंचायत समितीच्या विकासात्मक कार्यात शिक्षकांचे योगदान फार मोठे ...

Teachers' unions should maintain such affection | शिक्षक संघटनांनी असाच स्नेह कायम ठेवावा

शिक्षक संघटनांनी असाच स्नेह कायम ठेवावा

अल्का आत्राम : शिक्षक संघटनातर्फे सत्कार

चंद्रपूर : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी,पंचायत समितीच्या विकासात्मक कार्यात शिक्षकांचे योगदान फार मोठे आहे. आपण सर्वांनी केलेल्या सत्कारामुळे मला नवी प्रेरणा मिळली, आपण सर्वांनी असाच स्नेह कायम ठेवावा आणि पंचायत समिती पोंभूर्णाचा नावलौकिक वाढवावा, असे मत पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम यांनी व्यक्त केले.

शिक्षकांच्या संघटनेने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पंचायत समिती पोंभूर्णा येथे नव्याने रूजू झालेल्या सहाय्यक बीडीओ सुनीता मरसकोल्हे आणि शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक पती-पत्नी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जे. डी. पोटे यांच्या हस्ते सभापती अल्का आत्राम यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती पोंभूर्णाच्या उपसभापती ज्योती बुरांडे,गटशिक्षणाधिकारी बाबूराव मडावी, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप सोनपुरे, पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष सुधाकर कन्नाके, अखिल भारतीय शिक्षक संघाचे अभय कासनगोट्टुवार, लक्ष्मण सोनुले, पती-पत्नी संघटनेचे राजू इंगळे, मोहनदास ईटकलवार, शंकर आत्राम आदी संघटनेचे पदाधिकारी तसेच केंद्रप्रमुख प्रकाश कुंभरे, विनायक औतकर, कक्ष अधिकारी रश्मी पुरी, अल्का जेडुलवार, ज्योत्स्ना नागापुरे आदींची उपस्थिती होती. संचालन सुधाकर कन्नाके यांनी केले.

Web Title: Teachers' unions should maintain such affection