शिक्षकांच्या प्रलंबित समस्या १० फेबुवारीपर्यंत सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:37+5:30
प्रलंबित समस्या १० फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित विभागातील समस्या तात्काळ दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले.

शिक्षकांच्या प्रलंबित समस्या १० फेबुवारीपर्यंत सुटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग व आश्रम शाळांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शनिवार घेराव आंदोलन केले. एकाच दिवशी प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग व समाज कल्याण अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या विभागातील कारभारामुळे अनेक पीडित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्रस्त आहेत. त्यांच्या प्रलंबित समस्या १० फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित विभागातील समस्या तात्काळ दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेला न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग व आदिवासी शाळा संदर्भातील समस्या दूर करण्यासाठी समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. तिन्ही विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या विभागातील समस्या निकाली काढण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सदर आंदोलन प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात प्रांतिय उपाध्यक्ष एम. डी. धनरे, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कोषाध्यक्ष दिगांबर कूरेकर, सल्लागार देवराव निब्रड, प्रमोद कोंडलकर, संघटक मनोज वासाडे, आश्रम शाळा विभागाचे पदाधिकारी दिलीप गोखरे, किशोर नगराळे, सुरेंद्र अडबाले, राजु डाहूले, रवि बनपूरकर, प्रभाकर शेरकी, विठोबा हिंगाणे, भालचंद्र धांडे, पंकज बाराहाते सर्व अतिरिक्त शिक्षक व उपस्थित इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. प्रलंबित समस्या व मागण्यांमध्ये आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात येईल. सातव्या आयोगात एकस्तर योजना मंजूर करणेबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात यईल, असेही आश्वासनही देण्यात आले.
या आहेत मागण्या
१२ वर्ष सेवा झालेल्या आश्रमशाळा शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ तात्काळ मंजूर करण्यात येईल, १ तारखेस वेतन न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, चुकीच्या वेतननिश्चिता सुधारित करून मंजूर करण्यात येईल. २०१३ च्या परिपत्रकानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वरीष्ठ श्रेणीचा लाभ देण्यात येईल. भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव विनाविलंब मंजूर करण्यात येईल, या सर्व मागण्या तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे पीडित कर्मचाºयांना दिलासा मिळणार आहे.