कोविड विमा लाभापासून शिक्षक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:18+5:302021-04-20T04:29:18+5:30
चंद्रपूर : राज्यातील प्राथमिक शिक्षक मार्च २०२० पासून कोविड अंतर्गत विविध सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यासोबत शिक्षकांनाही पन्नास ...

कोविड विमा लाभापासून शिक्षक वंचित
चंद्रपूर : राज्यातील प्राथमिक शिक्षक मार्च २०२० पासून कोविड अंतर्गत विविध सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यासोबत शिक्षकांनाही पन्नास लाखांचे विमा कवच शासनाने लागू केले आहे. दरम्यान, कोविड सेवेत असताना मृत झालेल्या शिक्षकांच्या परिवाराला मात्र अद्याप क्लेम मिळाला नाही, अशा राज्यातील ७१ पीडित शिक्षकांच्या कुटुंबीयांना त्वरित विम्याचा क्लेम द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाला निवेदनही पाठविण्यात आले आहे.
कोविड सेवेत कार्यरत असताना राज्यातील अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत असताना शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता कोविड क्लेम न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मात्र उघड्यावर पडले आहेत. शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना मात्र क्लेम मिळाले आहेत. विमा रक्कम न मिळाल्याच्या गंभीर समस्येची दखल घेऊन पीडित शिक्षक परिवारांना तत्काळ न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य पदाधिकारी विजय भोगेकर, अलका ठाकरे, बळीराम मोरे, बालाजी पांडागळे, भूपेश वाघ, लिलाधर सोनवणे, दीपक वरहेकर, नारायण कांबळे, रवी सोयाम, लोमेश येलमुले, निखिल तांबोळी, सुनीता इटनकर, विद्या खटी, माधुरी निंबाळकर आदींनी केली आहे.