जिल्हा परिषदेच्या विसंगत कारभारामुळे शिक्षक त्रासले
By Admin | Updated: February 25, 2016 00:58 IST2016-02-25T00:58:00+5:302016-02-25T00:58:00+5:30
महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सभा सोमवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा राज्य सल्लागार एन. जी. तुर्के हे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या विसंगत कारभारामुळे शिक्षक त्रासले
तुर्के यांचा आरोप : पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सभा
चिमूर : महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सभा सोमवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा राज्य सल्लागार एन. जी. तुर्के हे उपस्थित होते.
ही सभा शिक्षक सहकारी पतसंस्था चिमूर येथे घेण्यात आली. यावेळी राज्य प्रमुख संघटक एन. आर. कांबळे, एन. डी. मुंगले, हरिश्चंद्र कामडी, ता.रा. दडमल, रवी वरखेडे, गंगाधर भैसारे, पांडुरंग मेहरकुरे प्रामुख्याने उपस्थित होते. तालुका स्तरावरील तथा जिल्हा स्तरावरील समस्यांबाबत शिक्षक प्रतिनिधींनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, कुठल्याही कार्यालयातील कर्मचारी पैशाशिवाय काम करीत नाही, पैसे दिले की, कोणतीही त्रुटी काढत नाही. मात्र पैसे न दिल्यास अनेक प्रकारचे कारणे दाखवून समस्या प्रलंबित ठेवतात. कोणाचेही काम पैशाने लवकर होते. ज्यांनी पैसे दिले नाही. त्यांना एक वर्ष, दीड वर्ष वाट पाहावी लागते. असे शासनाचे दुटप्पी धोरण आहे. या धोरणाला शिक्षक वर्ग त्रासून गेले आहे. तेव्हा संघटनेने योग्य पाऊल उचलून समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत एन.जठी. तुर्के यांच्यासह अनेकांनी व्यक्त करुन प्रशासनाविषयी संताप दर्शविला.
याचवेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना राज्य सल्लागार एन. जी. तुर्के यांनी संघटनेचे ब्रिदवाक्य न्यायाची चाड, अन्यायाची चिड, तप- ज्ञान- सेवा या ब्रिदाला अनुसरुन शिक्षकांनी तयार होवून न्यायासाठी लढा दिला पाहिजे. प्रशासनात काम करणारी माणसे योग्य प्रकारचे नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारामध्ये विसंगती निर्माण होत आहे. त्याचा फटका सर्वसाधारण शिक्षकाला निर्माण होत आहे. दहा शिक्षकांना एकाच वेळी न्याय मिळाला पाहिजे. परंतु तसे न घडता ज्यांनी पैशाचा वापर केला. त्याला अगोदर न्याय व ज्यांनी पैशाचा वापर केला नाही, त्यांना उशिरा न्याय, अशीच विसंगती पंचायत समिती व जिल्हा परिषदेत घडून येत आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे लढा उभारणे हे शिक्षकांसाठी हिताचे आहे, असे मत तुर्के यांनी व्यक्त केले.
सभेचे प्रास्ताविक एम. के. दडमल यांनी केले. संचालन विनोद महाजन यांनी केले. आभार रवी वरखेडे यांनी मानले.
यावेळी संघटनेचे काही पदे भरण्यात आली. या सभेला आर. एस. चांदेकर, डी. बी. चव्हाण, ए. एम. मडावी, डी. पी. गुडधे, एम. व्ही. नन्नावरे, ए. पी. ठोंबरे, पसारे, कऱ्हाडे, ढोक, भैसारे, पुरुषोत्तम पंधरे, सी.आर. मुळे, राजू कापसे, सिडाम, ठाकरे, गणवीर, एम. आर. शेडामे, केदार, नकाते, गौरकार, गुडधे, मुरकुटे, डी.सी. खोब्रागडे, आर. जी. नन्नावरे, जे. ए. गाठे, मंगाम तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)