शिक्षकांची मोर्चाद्वारे धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:58 IST2017-11-04T23:58:19+5:302017-11-04T23:58:30+5:30
वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात शासन आदेश रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.

शिक्षकांची मोर्चाद्वारे धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात शासन आदेश रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. दरम्यान, जिल्हा परिषदेपासून मोर्चा काढण्यात आल्या. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. सदर आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षकांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
दिवसेंदिवस शिक्षकांना आॅनलाईनची अनेक कामे करावी लागत आहेत. ती कामे बंद करून शासनाने डाटा आॅपरेटरची नियुक्ती करावी, २७ फेब्रुवारी २०१७ रोजी निर्गमित झालेल्या शासननिर्णयात दुरूस्ती करून इच्छुकांना बदलीे द्यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीसंदर्भात शासन आदेश रद्द करावा, २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, आॅनलाईन बदलीच्या धोरणात बदल करण्यात यावा, या मागण्या लावून धरण्यात आल्या. राज्यातील शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यासाठी शिक्षकांच्या संघटनेने वेळोवेळी पत्राच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. मात्र शिक्षकांच्या समस्या अद्यापही निकाली निघाल्या नाही. यामुळे शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी शिक्षक संघटनेचे समन्वयक मुकूंद जोशी यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात संतोष कनवर, विलास ढोबळे, निमकर कोडापे, नागरे तसेच विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.