शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक हा समाजाचा खरा कणा आहे

By admin | Updated: April 9, 2016 01:19 IST

शिक्षक हा समाजाचा खरा कणा असून ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे पवित्र कार्य शिक्षकाकडूनच होत आहे.

महेंद्र कल्याणकर : गोंडपिंपरीत शैक्षणिक परिसंवाद कार्यक्रमगोंडपिपरी : शिक्षक हा समाजाचा खरा कणा असून ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे पवित्र कार्य शिक्षकाकडूनच होत आहे. विद्यार्थ्याचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांमध्ये अनेक कौशल्य व सुप्त गुण भरलेले असतात. याचेच आदान प्रदान होण्याकरिता मिशन नवचेतना अभियान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. गोंडपिंपरी येथील स्थानिक खैरे कुणबी सभागृहात गुरूवारी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्या वतीने आयोजित शैक्षणिक परिसंवाद कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प. शिक्षण व बांधकाम सभापती देवराव भोंगळे होते. पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय भोगेकर, जि.प. सदस्य संतोष कुंभरे, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहीतकर, उपशिक्षणाधिकारी धनपाल फटींग, गटशिक्षणाधिकारी बल्लारपूर संजय हेडाऊ, भाऊराव देवतळे, युनिसेफ जिल्हा समन्वयक मयुर पुजारी व पुरोगामी समिती जिल्हा सरचिटणीस हरीश ससनकर, दीपक वरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी शिक्षण क्षेत्रात मिशन नवचेतनांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन लोमेश येलमुले यांनी केले. प्रास्ताविक विजय भोगेकर तर आभार पुरोगामी समितीचे तालुकाध्यक्ष गुरूदेव बाबनवाडे यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान जि.प. शाळा लिखितवाडाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून सुत्र संचालनातून करून उपस्थितांची मने जिंकली. या परिसंवादाला तालुक्यातील शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)