महागाई लादणाऱ्या केंद्र सरकारला धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST2021-07-15T05:00:00+5:302021-07-15T05:00:34+5:30
राजुरा काँग्रेसद्वारा भवानी मंदिर ते संविधान चौक आणि संविधान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या सायकल रॅली आणि जन आक्रोश आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तहसीलदार हरिश गाडे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.

महागाई लादणाऱ्या केंद्र सरकारला धडा शिकवा
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. हे सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचून धडा शिकवा, असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
राजुरा काँग्रेसद्वारा भवानी मंदिर ते संविधान चौक आणि संविधान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या सायकल रॅली आणि जन आक्रोश आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तहसीलदार हरिश गाडे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला सचिव नम्रता ठेमस्कर, अशोक देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, जि. प. सदस्य मेघा नलगे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरनुले , कुंदा जेणेकर, तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, नगरसेवक हरजीत सिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, साईनाथ बतकमवार, संतोष गटलेवर, महिला काँग्रेस अध्यक्ष कविता उपरे आदी उपस्थित होते.