शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

तथागत गौतम बुद्धांचा एक शांतीदूत हरपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:21 IST

साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म तब्बल अडीच हजार वर्षांनंतरही जगातील अनेक देशात मोठ्या दिमाखाने जिवंत आहे. त्या धर्माचा प्रचार व पसार करण्याचे काम भन्तेजीच्या माध्यमातून सुरू आहे.

ठळक मुद्देभन्ते राहुल बोधी यांच्यावर अंत्यसंस्कार : अधिष्ठान करताना भंन्तेवर बिबट्याच्या हल्ला

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म तब्बल अडीच हजार वर्षांनंतरही जगातील अनेक देशात मोठ्या दिमाखाने जिवंत आहे. त्या धर्माचा प्रचार व पसार करण्याचे काम भन्तेजीच्या माध्यमातून सुरू आहे. हाच प्रचार करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी चिवर धारण केलेल्या व तथागत गौतम बुद्धांच्या विचाराची पेरणी करण्यासाठी निघालेल्या भन्ते राहुलबोधी यांचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या संघरामगिरी येथे ४० दिवसांचे अधिष्ठान करीत असताना मैत्री भावना विसरलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शांतीदूताचा करूण अंत झाला.स्वतंत्र लढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिमूरक्रांती नगरी शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या सोनेगाव वन येथे महादेव वाळके यांच्या परिवारात राहुल यांचा जन्म झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण गावात तर पुढील शिक्षण ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी, पदवीपर्यंतचे शिक्षण चिमूरमध्ये झाले. शिक्षणानंतर राहुलने परिवाराला हातभार लावण्यासाठी गावात छोटे किराणा दुकान सुरू केले. मात्र त्यांना बुद्ध धम्माविषयीची तळमळ स्वस्थ्य बसू देत नव्हती. याचदरम्यान संघारामगीरी येथील काही भन्तेजीच्या संपर्कात आल्याने त्याने ध्यान-साधना सुरु केली. तसेच अनेक युवकांनाही धम्म शिबिर करायला लावले. दरम्यान राहुल तथागत गौतम बुद्धांच्या विचाराने प्रेरित झाल्याने तीन वर्षाअगोदर बौद्ध धम्माचे २२७ नियम ग्रहण करून विधिवत सदस्य झाले. तसचे बौद्धगया येथे धम्माची उपसंपदा घेतली. त्यामुळे राहुल हा भंते राहुलबोधी मध्ये परिवर्तीत झाले. यादरम्यान त्यांनी अरुणाचल प्रदेश, बांग्लादेश येथून बौद्ध धम्माचे ज्ञान प्राप्त केले.शिवणी येथे वर्षावास संपवून १३ धुतानग अधिष्ठानांपैकी दोन अधिष्ठान पूर्ण करण्याच्या दृष्टीने मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पहाडावरील बौद्ध विहारापासून एक किमी अंतरावर अरण्यकांक व वृक्षमुलिकांक अधिष्ठान करीत होते.दरम्यान सुष्टीतील प्राणी मत्रांवर मैत्रीची शिकवण देणाऱ्या भन्तेवर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा करूण अंत झाला. ध्यान साधनेत अधिष्ठान सुरू असताना मृत्यू ओढावल्यास बौद्ध शासनात पवित्र मानल्या जात असले, तरी त्यांच्या जाण्याने तथागत गौतम बुद्धाचा शांतीदूत हरपला आहे. तर संघारामगिरीचे जनक महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांच्या संघात एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.परिसरातील बौद्ध बांधवांनी घेतले अंत्यदर्शनखडसंगी : बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बौद्ध भिक्खू राहुलबोधी यांच्यावर खडसंगी येथील स्मशानभूमीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आला. भंन्ते राहुलबोधी यांना अखेरचा निरोप देण्याकरिता अनेक धम्मबांधव सश्रुनयानांनी सहभागी झाले होते. पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा पार्थिव भिक्खू संघाच्या स्वाधीन केले. दरम्यान बौध्द भिक्खू संघ महाप्रज्ञा साधनभूमी, संघरामगिरीच्या व्यवस्थापनाने त्यांच्यावर अंत्यविधी खडसंगी येथील स्मशानभूमीत करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील गावा-गावांतून धम्मबांधवांचे जत्थे रात्री उशिरापर्यंत स्थानिक सम्राट अशोक बुद्धविहारात दाखल होऊन त्यांना वंदन केले. कडाक्याच्या थंडीतही मोठ्या संख्यने धम्मबांधव साश्रूनयनांने अंतयात्रेत सहभागी झाले होते. संघनायक महाथेरो भदंत ज्ञानज्योती व त्यांच्या भिक्खू संघाच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला.