अतिक्रमणासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार -सुधीर मुनगंटीवार

By Admin | Updated: September 1, 2015 00:51 IST2015-09-01T00:51:09+5:302015-09-01T00:51:09+5:30

मूल येथील रेल्वेच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत लवकरच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सोबत बैठक घेऊन अतिक्रमण नियमित करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे

Talking with the Railway Minister regarding encroachment - Sudhir Mungantiwar | अतिक्रमणासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार -सुधीर मुनगंटीवार

अतिक्रमणासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार -सुधीर मुनगंटीवार

मूल : मूल येथील रेल्वेच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत लवकरच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सोबत बैठक घेऊन अतिक्रमण नियमित करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रहिवाशांना दिले.
या विषयीची बैठक शुक्रवारी मूल येथील विश्रामगृहावर घेण्यात आल्यावर त्यांनी अतिक्रमण धारकांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, नगराध्यक्ष रिना थेरकर, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, तहसीलदार राजेश सरवादे व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमण तात्काळ काढावे अशा प्रकारच्या नोटीस रेल्वे प्रशासनाने रहिवाशांना पाठविल्या होत्या. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यावर ना. मुनगंटीवार यांनी अतिक्रमणधारकांशी चर्चा करून हा विषय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून अतिक्रमण नियमित करण्याची विनंती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच कायमस्वरूपी घरे देण्याबाबत योजना करण्यावर विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
यानंतर ना. मुनगंटीवार यांनी मूल शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. बसस्थानक, मामा तलाव, मा. सा. कन्नामवार सभागृह, सीमेंट रस्ता, रेल्वे स्थानक, क्रीड़ा संकुल, रुग्णालय, नवीन प्रशासकीय भवन, स्मशानभूमी, बाजार समिती आदी ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. केली. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेत मंजूर करण्यात आलेल्या निधीचे धनादेश ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Talking with the Railway Minister regarding encroachment - Sudhir Mungantiwar