‘त्या’ भाजपाच्या विकृत कार्यकर्त्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:22 IST2019-02-10T21:22:17+5:302019-02-10T21:22:36+5:30
येथील भाजपाचे युवा नेते शरद बंडू गेडाम यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात अपमानजनक मजकूर फेसबुकवर टाकला. या घटनेचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध करुन त्या विकृत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.

‘त्या’ भाजपाच्या विकृत कार्यकर्त्यावर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील भाजपाचे युवा नेते शरद बंडू गेडाम यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात अपमानजनक मजकूर फेसबुकवर टाकला. या घटनेचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध करुन त्या विकृत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.
अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी ( वाड्रा) यांच्याबद्दल भाजपाच्या नेत्या व कार्यकार्त्यांनी अपमानजनक टीका केली होती. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच येथील भाजपा युवा नेता शरद गेडाम यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात अपमानजनक मजकूर फेसबुकवर टाकला. तसेच क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या एक युवतीबद्दलसुद्धा टिंगल करणारे वृत्त फेसबुकवर टाकले. यामुळे अशा विकृत मानसावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदन घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू रेड्डी, चंद्रपूर काँग्रेस शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात सैय्यद अनवर, अनील सुरपाम, अजय उपाध्येय, शहजाद शेख, बालकिशन कुळसंगे, रंजीत राखुंडे आदी उपस्थित होते.