राजुरा अत्याचारप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:52 IST2019-05-21T22:52:14+5:302019-05-21T22:52:32+5:30
जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जिजस शाळेच्या वसतिगृहात आदिवासी विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, ...

राजुरा अत्याचारप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा
ठळक मुद्देभाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जिजस शाळेच्या वसतिगृहात आदिवासी विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, यासाठी अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आ. संजय धोटे, आ. अशोक उईके, आ. राजू तोडसाम, आ. संजय पुराम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व आपल्याच मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. या प्रकरणी सखोल चौकशी करून त्या अनुषंगाने दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.