ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:01:10+5:30

विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक व भावनिक विकासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करून गावातील उपलब्ध साधनांद्वारे गरजु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद सीईओ राहूल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सरपंचाना केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रत्येक सरपंचाना भावनिक पत्र पाठविले आहे.

Take the initiative to reach out to online learning students | ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्या

ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्या

Next
ठळक मुद्देसीईओंचे सरपंचांना भावनिक पत्र : सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांच्या पाठीमागे उभे रहा


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून प्रत्येक जण वेगळा अनुभव घेत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक व भावनिक विकासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करून गावातील उपलब्ध साधनांद्वारे गरजु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद सीईओ राहूल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सरपंचाना केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रत्येक सरपंचाना भावनिक पत्र पाठविले आहे.
शाळा सुरु नसल्या तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहे. मुलांपर्यंत ऑनलाईन माध्यमाद्वारे अभ्यासक्रम पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही. यासाठी शासनाने सुरु केलेले उपक्रम जिल्ह्यातील मुलांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याची आपण सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, काही पालकांकडे टीव्ही, रेडिओ, स्मार्ट फोन नाही. अशावेळी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी समाज मंदिर, विहारामध्ये असलेल्या लाऊडस्पीकचाही वापर करता येईल, एवढेच नाही तर ग्रामपंचायत कार्यालय, समाजभवन येथील टीव्ही, रेडिओ या सुविधांचाही विद्यार्थ्यांसाठी उपयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचवण्याचे आव्हान आपण सहज पेलू शकणार आहे. यातून ऑनलाईन शिक्षणाचे द्वार सुरु करावे, असेही त्यांनी सरपंचांना पाठविलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

गावातील भिंती बोलक्या करा
प्राथमिक स्तरावरील शाळा अद्यापही सुुरू झाल्या नाही. त्यामुळे अभ्यासापासून मुले दूर जात आहे. त्यांच्या डोळ्यासमोर सतत शिक्षणाविषयी जनजागृती व्हावी, त्यांच्यामध्ये मागील शैक्षणिक सत्रातील तसेच चालू सत्रातील अभ्यासक्रम उभा रहावा यासाठी गावातील सार्वजनिक भिंतींवर शैक्षणिक माहिती, गणितीय सुत्रे रंगविण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहे. या माध्यमाधातून जरी विद्यार्थी शाळेत गेले नसले तरी त्यांच्या समोर सतत अभ्यासाविषयी आवड निर्माण होतील, असेही नमूद करण्यात आले आहे.


या निधीतून करता येईल शाळांची स्वच्छता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही शाळा बाहेरील नागरिकांना राहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. आजही काही शाळांमध्ये क्वारंटाईन केल्या जात आहे. त्यामुळे शाळांच्या स्वच्छतेचा मोठा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर उभा आहे. यासाठी सीईओंनी उपाय सांगितला असून १४ आणि १५ व्या वित्त आयोग तसेच ग्रामपंचायतस्तरावरील उपलब्ध निधीतून शाळांची स्वच्छता करून द्यावी, असेही सरपंचांना त्यांनी पत्रातून सांगितले आहे.

तरुणांना स्वयंसेवक म्हणून घोषित करावे
गावातील विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत शिक्षणामध्ये मागे पडू नये, यासाठी गावातील शिक्षित तरुणांना स्वंयसेवक म्हणून घोषित करावे. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवता येईल.
प्रभावी शिक्षण हेच व्यक्तीमत्व विकासाचे अभीन्न अंग आहे. याद्वारेच देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणारी पिढी निर्माण होणार आहे. यामध्ये आपला हातभार लागणे ही सुद्धा आपल्यासाठी अभिमानाचीच बाब आहे.असेही पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Take the initiative to reach out to online learning students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.