वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा
By Admin | Updated: July 2, 2014 23:16 IST2014-07-02T23:16:10+5:302014-07-02T23:16:10+5:30
वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती डी.के. आरीकर यांनी केले. येथील वनप्रशिक्षण संस्था, वनराजिक महाविद्यालय,

वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा
चंद्रपूर : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती डी.के. आरीकर यांनी केले. येथील वनप्रशिक्षण संस्था, वनराजिक महाविद्यालय, पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
सर्वप्रथम वृक्षारोपण करून व वडाच्या झाडाची पूजा करून खासदार हंसराज अहीर यांनी पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी मंचावर समितीचे अध्यक्ष डी.के. आरीकर, आमदार नाना शामकुळे, अॅड. भगवान पाटील, राकाँच्या महिला फ्रंटच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा जोशी, पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे उपाध्यक्ष राजेश सोलापन, संघटक सुरेश शर्मा, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, वनपरिक्षेत्राधिकारी (सामाजिक वनीकरण) धांडे आदींची उपस्थिती होती. खा. हंसराज अहीर म्हणाले, चंद्रपूर जिल्हा वनाच्छादित प्रदेश म्हणून ओळखला जात असतानाच मात्र आता येथील प्रदूषण गंभीर बाब बनत चालली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उद्योगावर वचक राहिला नसून जिल्ह्यात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी स्वत: येऊन पुढाकार घेतल्यास प्रदूषण नियंत्रणावर मात करता येईल.
प्रास्ताविकात अॅड. भगवान पाटील म्हणाले, सोशल सायन्सचा आतापर्यंत मानवामध्ये विकास झालेला नाही. प्रत्येक नागरिकाने मॅन पावरवर अवलंबून न राहता विधायक मार्गाचा अवलंब करून वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलित करण्याचे आवाहन केले.
याच कार्यक्रमात पर्यावरण विशेषांकाचेसुद्धा पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याच कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक म्हणून केवशराव मांडवगडे, सुधीर चंद्रात्रे, तर पर्यावरण मित्र म्हणून बंडोपंत बोडेकर, अनुप पाल, दिनकर म्हशाखेत्री, मिरा कामडी, ज्योती एकोणकर, वंदना मुनघाटे, विणा भगत, प्रगती माकोडे, राजू हनमंते, रविंद्र मोरे, मोरेश्वर पेंदाम, अशोक दहेलकर यांचा पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष रोपटे, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रसिका विंचूरकर नागपूर यांना प्रथम, अभिलाषा झाडे चंद्रपूर हिला द्वितीय व आयुषा आरीकर भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला. जयश्री कस्तुरे, गुणिका पोटदुखे या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. (शहर प्रतिनिधी)