कर्करोग टाळण्यासाठी स्वत:ची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:31+5:302021-02-06T04:50:31+5:30

चंद्रपूर : कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेण्याची महिलांची सर्वसाधारण मानसिकता असते, मात्र त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत ...

Take care of yourself to prevent cancer | कर्करोग टाळण्यासाठी स्वत:ची काळजी घ्यावी

कर्करोग टाळण्यासाठी स्वत:ची काळजी घ्यावी

चंद्रपूर : कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेण्याची महिलांची सर्वसाधारण मानसिकता असते, मात्र त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे केवळ त्या महिलेचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचीच हानी होते. त्यामुळे कर्करोग व इतर आजार टाळण्यासाठी विशेषता महिलांनी व पुरुषांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे, असे मत प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी व्यक्त केले.

मातोश्री विद्यालय व चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग जनजागृती औचित्य साधून मातोश्री सभागृहात विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होेते.

यावेळी प्रकल्प व्यवस्थापक डॉ. रोशन मेंढे, प्रकल्प समन्वयक सुरज साळुंके, आशिष सुपासे, मुख्याध्यापक संजय बिजवे , मुख्याध्यापिका संध्या वाढई, पर्यवेक्षक प्रवीण रोकमवार, पवन पिदुरकर, सतीश पाटील, भरत कुंडले, तथा शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉक्टर रोशन मेंढे मार्गदर्शन करताना म्हणाले, लवकर निदान व योग्य उपचारांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महिलांनी, पुरुषांनी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नियमित तपासणी करून घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमामध्ये सुरज साळुंखे यांनी कर्करोगाविषयी माहिती दिली.

Web Title: Take care of yourself to prevent cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.