व्यापाऱ्याला मारहाणप्रकरणी पोलिसांवर कारवाई करा

By Admin | Updated: September 3, 2015 00:38 IST2015-09-03T00:38:52+5:302015-09-03T00:38:52+5:30

चंद्रपूरचे प्रतिष्ठित व्यापारी रोहीत बोथरा यांना मंगळवारी पोलिसांनी विनाकारण मारहाण केली.

Take action against the policeman on the assassination of the businessman | व्यापाऱ्याला मारहाणप्रकरणी पोलिसांवर कारवाई करा

व्यापाऱ्याला मारहाणप्रकरणी पोलिसांवर कारवाई करा

पत्रकार परिषद : चंद्रपूर व्यापारी मंडळाची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूरचे प्रतिष्ठित व्यापारी रोहीत बोथरा यांना मंगळवारी पोलिसांनी विनाकारण मारहाण केली. या अमानुष मारहाण प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर व्यापारी मंडळाने पत्रकार परिषदेतून केली. मारहाण प्रकरणी व्यापारी मंडळातर्फे बुधवारी निषेध रॅली काढण्यात आली.
पोलीस व व्यापारी यांचे सलोख्याचे संबंध असताना, ही कारवाई पोलीस कर्मचाऱ्यांच्या अमानवीय कृत्याच्या परिचय देणारी आहे. पोलिसांच्या या वागणुकीने सर्व व्यापारी व नागरिकांच्या रोष पसरला असून पोलिसांच्या कर्तव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांची ही अमानुष वागणूक जनसामान्याच्या मनात दहशत निर्माण करणारी आहे, असे व्यापारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले. निरपराध युवक रोहीत बोथरा यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तिच कारवाई करावी, जी सर्व साधारण नागरिकांवर केली जाते. व्यापारी संघटना सदैव पोलीस विभागाशी सलोख्याचे संबंध ठेवत आलेली आहे. त्यामुळे घटनेशी संबंधीतांवर कठोर कारवाई न झाल्यास नाईलाजाने आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल व यामुळे होणाऱ्या परिणामास पोलीस विभागच जबाबदार राहील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संतोष चिल्लावार, कार्याध्यक्ष गोविंद सारडा, सचिव प्रभाकर मंत्री, उपाध्यक्ष सुरेश खनके, सुरेश रोहरा, रामजीवन परमार, सुमेध कोतपल्लीवार, सागर चिंतावार, अखिलेश आर्इंचवार आदींनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Take action against the policeman on the assassination of the businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.