शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गोड गळ्याची कोमल कायमची हरवली !

By admin | Updated: March 24, 2015 00:38 IST

तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ स्वररसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी गोड गळ्याची कोमल अशोक चांदेकर ही युवा गायिका कायमची हरपली आहे.

चंद्रपूर : तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ स्वररसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी गोड गळ्याची कोमल अशोक चांदेकर ही युवा गायिका कायमची हरपली आहे. आपल्या मधुर आवाजाचे सूर दूरवर पोहोचविणाऱ्या कोमलचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी सोमवारी सायंकाळी ६ वाजता अल्प आजाराने निधन झाले. या दु:खद वार्तेने विदर्भातील संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त होत होती.मागील काही दिवसांपासून कोमल आजारी होती. मात्र गरिबीच्या परिस्थितीमुळे तिच्यावर योग्य उपचार होऊ शकले नव्हते. अशातच सेवादल काँग्रेस भवनामागील आपल्या वडीलांच्या घरी तिची प्राणज्योत मालवली.कोमलच्या कंठातील स्वर जेवढा मधुर आणि सुरेल होता तेवढाच तिच्या आयुष्याचा प्रवास खडतर राहीला होता. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या कोमलचे वडील अशोक चांदेकर यांचे आंबेडकर चौकात चुन्याचे दुकान होते. यावर या कुटुंबाची कशीबशी गुजराण होत असे. आईवडील आणि दोन बहिणी व एक भाऊ असे हे कुटुंब होते. घरी संगीताचे वातावरण नसतानाही कोमलला उपजतच संगीताचे ज्ञान होते. वयाच्या चौथ्या वर्षापासून ती मंचावरून गायला लागली. तिच्या शेजारी राहणाऱ्या सुरेखा दुधलकर यांनी कोमलमधील प्रतिभा ओळखून तिला संगीताचे धडे देणे सुरू केले. त्यामुळे सुरेखा दुधलकर यांचे स्थान कोमलच्या आयुष्यात मोठे होते. गायनामध्ये करिअर करायचे असे ठरवून तिने संगीतामध्ये बीए केले होते. तर संगीत विषारदसुद्धा केले होते. आपल्यातील प्रतिभेच्या बळावर तिने चंद्रपुरातच नव्हे तर विदर्भात स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अनेक स्पर्धांमध्ये तीने पुरस्कार मिळविले होते. यवतमाळ, वाशिम, नागपूर, समुद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, गडचिरोली यासह अनेक ठिकाणच्या मंचावरून तिची प्रतिभा साकारली होती. स्पर्धातील सहभागानंतर गेल्या काळापासून ती सांगितिक व्यावसायिक क्षेत्राकडे वळली होती. यातून स्वत:चे शिक्षण आणि कुटुंबाला मदतही ती करीत असे. शहरातील अनेक संगीत संस्थांशी तिचे स्रेहाचे संबंध होते. तिच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले. मंगळवारी दुपारी १२ वाजता तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कावर होत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)गाजविली होती कारकीर्दगेल्या २५ वर्षांपासून मंचावर झळकणारी कोमल चांदेकर म्हणजे चंद्रपुरातील संगीत क्षेत्राची ओळख होती. चंद्रपुरातील संगीत क्षेत्रात महिला गायिकांची कमतरता असताना कोमलने आपल्या प्रतिभेच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. युवा महिला गायिकांमध्ये तिचे नाव सन्मानाने घेतले जायचे. शहरातील अनेक नामांकित स्पर्धा आणि आॅर्केस्ट्रा, सुमग संगीताच्या कार्यक्रांमध्ये तिची मंचावर हमखास उपस्थिती असायची. अनेक स्पर्धांमध्ये परिक्षणाचीही जबाबदारी तिने पार पाडली होती.