राजुरात आमदार निधीतून स्वर्गरथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST2021-07-29T04:28:17+5:302021-07-29T04:28:17+5:30
राजुरा : नगरपरिषद राजुराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन राजुरा शहरातील नागरिकांसाठी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ ...

राजुरात आमदार निधीतून स्वर्गरथ
राजुरा : नगरपरिषद राजुराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन राजुरा शहरातील नागरिकांसाठी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लाख रुपये निधी मंजूर करून, येथे स्वर्गरथ उपलब्ध केला.
या स्वर्गरथाचे लोकार्पण नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी स्वर्गरथाचे चालक सिडाम यांच्याकडे चावी सुपुर्द करून केले. शहरातील नागरिकांना अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथाची आवश्यकता होती. येथे ही सुविधा उपलब्ध नसल्याने पूर्वी गडचांदूर, बल्लारपूरवरून स्वर्गरथ आणावे लागत होते. नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी येथे स्वर्गरथ उपलब्ध करून दिला. यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय आता दूर होईल, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य अजय बतकमवार, अरविंद लांडे, नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.