पाहार्णी जंगलात युवकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:29 IST2021-05-13T04:29:02+5:302021-05-13T04:29:02+5:30

ब्रह्मपुरी : तोरगाव(बु.) येथील रहिवासी युवक १५ दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान, पाहार्णी लगत असलेल्या जंगलात एका झाडाला गळफास लावलेल्या ...

Suspicious death of a youth in Paharni forest | पाहार्णी जंगलात युवकाचा संशयास्पद मृत्यू

पाहार्णी जंगलात युवकाचा संशयास्पद मृत्यू

ब्रह्मपुरी : तोरगाव(बु.) येथील रहिवासी युवक १५ दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान, पाहार्णी लगत असलेल्या जंगलात एका झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह मंगळवारी आढळून आला आहे. वरकरणी ही आत्महत्या दिसत असली तरी घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे.

अंकित बंडुजी फुलबांधे (२५) असे मृतकाचे नाव आहे.

अंकित २४ एप्रिलला घरची दुचाकी घेऊन घरून कुटुंबीयांना काहीच माहिती न देता निघाला. त्यानंतर घरी परतच आला नाही. कुटुंबीयांनी इतरत्र शोधाशोध सुरू केली. मात्र कुठेही पत्ता लागला नाही. अखेर १५ दिवसांनंतर अंकितचा मृतदेह नागभीड तालुक्यातील पाहार्णीलगत असलेल्या जंगलात झाडाला गळफास लावून असलेल्या स्थितीत ढोरपा येथील तेंदुपत्ता तोडणाऱ्या नागरिकांना आढळला. त्यांनी याची माहिती परिसरात तसेच कुटुंबीयांना व नागभीड पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृत्यूचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.

Web Title: Suspicious death of a youth in Paharni forest