चंद्रपुरातील ‘ती’ वाघीण व तिच्या दोन बछड्यांवर विषप्रयोगाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:01 PM2020-06-17T12:01:52+5:302020-06-17T12:02:18+5:30

१० जून रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या सीतारामपेठ बिटमध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर तब्बल चार दिवसांनी याच परिसरात सदर वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला.

Suspicion of poisoning of 'that' tigress and her two calves in Chandrapur | चंद्रपुरातील ‘ती’ वाघीण व तिच्या दोन बछड्यांवर विषप्रयोगाचा संशय

चंद्रपुरातील ‘ती’ वाघीण व तिच्या दोन बछड्यांवर विषप्रयोगाचा संशय

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षेकडे कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ११५ वाघ आणि १५१ बछडे असल्याची नुकतीच नोंद झाल्यानंतर वन विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच १० जून रोजी वाघीण आणि १४ जूनला तिच्या दोन बछड्यांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने या आनंदावर विरजण पडले. लॉकडाऊन कालावधीत वन क्षेत्रात सुरक्षेसाठी गस्त घालण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाघीण व तिच्या दोन्ही बछड्यांवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
१० जून रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या सीतारामपेठ बिटमध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर तब्बल चार दिवसांनी याच परिसरात सदर वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. वास्तविक, वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा मृत्यू एकाचदिवशी झाला असावा, असेही बोलले जात आहे. मात्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वनाधिकाऱ्यांना वाघिणीच्या मृतदेहासोबत तिच्या दोन बछड्यांचे मृतदेह दिसलेच नाही. नंतर चार दिवसांची ते गवसले. एकाच परिसरात वाघीण आणि तिच्या बछड्यांच्या झालेल्या मृत्यूमागे एकच कारण असावे, असेही बोलले जात आहे. या घटनेमागे विषप्रयोग असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. वाघीण आणि तिच्या दोन्ही बछड्यांचे अवयव हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवाल अद्याप आला नाही. याप्रकरणी ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने एका अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात दैनंदिन गस्त घालण्याकडे कानाडोळा करण्यात आला. याच कालखंडात आॅनलाईन ताडोबा सफारीसंदर्भात कार्यवाही करण्यासाठी बºयाच वन कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आले. त्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आल्या. या कालखंडात तलावात विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, दोन बछड्यांचे मृतदेह आढळलेल्या तलावात दोन माकडांचाही मृतदेह देखील मिळाल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Suspicion of poisoning of 'that' tigress and her two calves in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ