शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून दुर्गापुरात थरार; एकाची हत्या, तिघे गंभीर; ​भररस्त्यात झाला राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 21:24 IST

बर्फ फोडण्याचा सुराच भोसकला

​चंद्रपूर : चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून भररस्त्यात एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुर्गापुरातील कोयना गेटजवळ घडली. यश हरिदास फाले (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी प्रफुल चिमणकरसह मृत यशचे मित्र अंशुल रायपुरे, अभी रायपुरे (सर्व रा. ऊर्जनगर, वॉर्ड क्र. ५) हे जखमी झाले आहेत.

​चिमणकर यांना पत्नीचे यशच्या वडिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. सततच्या वादातून प्रफुल चिमणकर हे पत्नीपासून विभक्त राहत होते. बुधवार दि. १ एप्रिलच्या रात्री चिमणकर यांची पत्नी अचानक घरी आली, मात्र संशयाच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. गुरुवारी सकाळी यश आपले मित्र अंशुल व अभी यांच्यासोबत कोयना गेट परिसरातील हनुमान मंदिरात जेवण करण्यासाठी गेला होता. तेथून परत येताना ते चिमणकर यांच्या नाश्ता सेंटरवर थांबले. तिघांनी लस्सीसुद्धा पिली. दरम्यान, यशने बुधवारच्या भांडणाचा चिमणकर यांना जाब विचारला. यावरून दोघांत बाचाबाची झाली. दरम्यान, यशने चिमणकर यांच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडला, तर चिमणकरने बर्फ फोडण्याचा धारदार सुरा यशच्या पोटात खुपसला. या वादात यशचे मित्रसुद्धा जखमी झाले.​वाटेतच सोडला दम

​कोयना गेट परिसरात भांडण झाल्याची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी गौरव कायंदेपाटील व त्यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी यशला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी चिमणकर याच्यावर हत्येचा गुन्हा, तर यशच्या मित्रांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी गौरव कायंदेपाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी 'लोकमत'ला दिली. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Durga Nagar Shaken by Character Suspicions: One Dead, Three Injured

Web Summary : In Durgapur, a man was stabbed to death over suspicions of infidelity. The victim, Yash Phale, died en route to the hospital. Three others, including the accused Praful Chimankar, were injured in the brawl. Police have registered cases against Chimankar and Phale's friends.