चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा संशयित रुग्ण आणला नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:20 IST2020-03-20T15:19:23+5:302020-03-20T15:20:10+5:30
: वेकोलि माजरी क्षेत्रातील ओसीएममध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाºयाला शुक्रवारी कोरोनाचा संशयित म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा संशयित रुग्ण आणला नागपुरात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलि माजरी क्षेत्रातील ओसीएममध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला शुक्रवारी कोरोनाचा संशयित म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.
वेकोलि माजरी क्षेत्रातील ओसीएममध्ये काम करणारा एक कर्मचारी हा वणी येथील रहिवासी असून त्याच्याकडे फ्रांस येथून दोन पाहुणे आले होते. ते परत आपल्या देशात गेले. तेव्हापासून या कर्मचाऱ्याला सर्दी, ताप व खोकला जाणवू लागला. तो दोन-तीन दिवसांपासून कर्तव्यावर येत नसल्याने त्याच्या एका मित्राने फोन केला असता ‘मला कोरोनाची लागण झाल्याची शंका होत असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. लगेच याची माहिती वेकोलि अधिकाऱ्यांना व वेकोलि माजरीच्या रुग्णालयातील डॉक्टराना दिली. डॉक्टरांनी लगेच सदर कर्मचाऱ्याला बोलावून त्याची तपासणी केली व नागपूरला पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र संशयित रुग्ण नागपूरला जाण्यास तयार होत नव्हता. अखेर त्याला बळजबरीने रुग्णवाहिकेत बसवून नागपूरला रवाना करण्यात आले. दरम्यान, वेकोलि रुग्णालयातील डॉ. पाटकर यांनी त्या रुग्णाच्या कुटुंबीयांनाही तपासणीसाठी रुग्णालयात बोलावले आहे.