गॅस पाईप लाईनसाठी सर्वेक्षण सुरु

By Admin | Updated: September 16, 2014 23:37 IST2014-09-16T23:37:15+5:302014-09-16T23:37:15+5:30

आंध्र प्रदेश ते राजस्थानपर्यंत टाकण्यात येणाऱ्या नॅचरल गॅस पाईप लाईनसाठी भद्रावती येथील विंजासन व गवराळा तसेच तालुक्यातील वडाळा (रिठ), चिरादेवी येथील शेतजमिनीचा सर्व्हे सुरू

Survey started for gas pipeline | गॅस पाईप लाईनसाठी सर्वेक्षण सुरु

गॅस पाईप लाईनसाठी सर्वेक्षण सुरु

अंतिम टप्पा : आंध्र प्रदेश ते राजस्थान व्हाया भद्रावती
सचिन सरपटवार - भद्रावती
आंध्र प्रदेश ते राजस्थानपर्यंत टाकण्यात येणाऱ्या नॅचरल गॅस पाईप लाईनसाठी भद्रावती येथील विंजासन व गवराळा तसेच तालुक्यातील वडाळा (रिठ), चिरादेवी येथील शेतजमिनीचा सर्व्हे सुरू असून सर्व्हे अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नॅचरल गॅसची पाईप लाईन आंध्र प्रदेशातील मल्लावस्म ते राजस्थान येथील विजापूरपर्यंत टाकण्यात येणार आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय गुजरात येथील बडोदा शहरात आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लक्कडकोट ते अमरावती जिल्ह्यातील पुसली या गावापर्यंत सदर पाईप लाईनचे काम होणार असुन हे अंतर जवळपास १७०४ कि.मी. आहे.
भद्रावती येथील विंजासन, गवराळा तसेच तालुक्यातील वडाळा (रिठ) व चिरादेवी येथे हा सर्व्हे सुरु आहे. शेतजमिनीतुन जाणारी गॅस पाईप लाईन ही पावने तीन फुट व्यासाची असुन जमिनीच्या पाच फुटखाली राहणार आहे. पाईपलाईनसाठी १०० फुट जागेची राहणार असून त्यावर शेतकरी वहीवाट करू शकणार आहे. जमिनीच्या बाजारभावाच्या १० टक्के रक्कम मोबदला म्हणून शेतजमिन मालकास मिळणास आहे. पाईपलाईन टाकताना शेतात पीक असेल तर, संपूर्ण पिकाचे पैसे मोबदला म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Survey started for gas pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.