लॉकडाऊनच्या काळात बचत गटांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:58+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मूल नगरपरिषदतर्फे जनजागृती करुन विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोना विषाणूचा सामना करण्याविषयी परिपूर्ण कल्पना आत्मसात करण्यात आल्याने सर्वत्र शासनाचे दिशा निर्देश काटेकोरपणे पाळले जात आहे.

Support self-help groups during lockdown | लॉकडाऊनच्या काळात बचत गटांना आधार

लॉकडाऊनच्या काळात बचत गटांना आधार

ठळक मुद्देमहिलांना मास्क बनविण्याचे काम : मूल नगरपालिकेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे हातावर घेऊन पानावर खाणाऱ्या कुटुंबाचा रोजगार हिरावला गेला आहे. अशा कुटुंबाला आधार देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या पुढाकाराने महिला बचत गटातील महिलांना माक्स बनविण्याचे काम देण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात बचत गटातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. शहरात माक्सचा तुटवडा पडू नये, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मूल नगरपरिषदतर्फे जनजागृती करुन विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोना विषाणूचा सामना करण्याविषयी परिपूर्ण कल्पना आत्मसात करण्यात आल्याने सर्वत्र शासनाचे दिशा निर्देश काटेकोरपणे पाळले जात आहे.
महिला सक्षम बनली पाहीजे हा हेतू नगरपरिषदेचा असल्याने मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी स्वत: पुढाकार घेऊन सन. २०१९-२० या आर्थिक वर्षात न.प.फंडातून पाच टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आला. मूल शहरातील ८९ दिव्यांगाना प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये त्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात करण्यात आले. या रक्कमेचा उपयोग महिला बचत गटाच्या महिलांनी कापडी मॉक्स तयार करण्याचा उद्योग सुरू केला. आदर्श वस्ती स्तर संघ, संस्कार वस्ती स्तर संघ, लक्ष्मी महिला बचत गट या बचत गटातील महिलांनी माक्स तयार केले. कोरोना विषाणूच्या परिणामाने सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे आजही बाहेर पडणे म्हणजे कोरोनाला जवळ घेणे आहे ही भीती सर्वत्र असल्याने घराबाहेर पडण्याची हिंमत केली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने घरच्या घरी कापडी माक्स शिवण्याचे काम देऊन एक प्रकारे फार मोठा आधार दिल्याचे दिसून आले.

नगरपरिषद प्रशासन सतत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असल्याने त्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असल्याने मजूरी करणाऱ्या महिलांचा रोजगार हिरावला गेला. हे हेरून नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी पुढाकार घेऊन महिला बचत गटाच्या महिलांना मॉक्स बनविण्याचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात महिलांना फार मोठा आधार मिळाला आहे.
- रितेश भोयर, प्रकल्प अधिकारी, न.प.मूल

Web Title: Support self-help groups during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.