चंद्रपूरकरांना योग्य व स्वच्छ पाणी पुरवठा करा
By Admin | Updated: May 25, 2017 00:28 IST2017-05-25T00:28:34+5:302017-05-25T00:28:34+5:30
शहर महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर आणि राहुल पावडे सभापती स्थायी समिती यांनी मंगळवारला सकाळी ८ वाजता शहरात असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली.

चंद्रपूरकरांना योग्य व स्वच्छ पाणी पुरवठा करा
अंजली घोटेकर : शहरातील पाण्याच्या टाकीची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर आणि राहुल पावडे सभापती स्थायी समिती यांनी मंगळवारला सकाळी ८ वाजता शहरात असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली. यावेळी पाण्याची टाकी व फिल्टर साफ करुन शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना महापौर अंजली घोटेकर यांनी कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारीवर्गांना दिल्या.
मागील काही दिवसांपासून शहरात दूषित पाण्याचा पूरवठा होत आहे. तसेच पाण्याची वास येणे, पाण्याच्या अपूरा पुरवठा व दूषित पाण्यामुळे लोकांच्या प्रकृतीवर होणारा परिणाम याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होती. त्या तक्रारीच्या निवारणासाठी महापौर अंजली घोटेकर यांनी रामनगर पाणी टाकी, तुकूम फिल्टर प्लँट, मित्र नगर, वडगाव पाणी टाकी, घुटकाळा पाणी टाकी, बंगाली कॅम्प पाणी टाकी, बायपास व बाबूपेठ, टागोर शाळा, विठ्ठल मंदीर परिसरातील पाण्याच्या टाकीची पाहणी केली.
या पाहणीत काही ठिकाणी नागरिकांनी अवैध कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे पाणी योग्यरित्या नागरिकांपर्यंत पोहचत नाही. काही ठिकाणी इलेक्ट्रीक पंप लावल्या जातात. परिणामी पाणी पोहचत नाही. त्यामुळे महापौर अंजली घोटेकर यांनी कंत्राटदार व अभियंता बोरीकर यांना अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
तसेच सर्व अवैध कनेक्शन ताबडतोब काढून घ्यावी, ज्या ठिकाणी बोअरिंग नांदूरस्त आहेत, त्या सर्व बोअरिंग तात्काळ दुरुस्त करून सुरू कराव्यात.
नागरिकांना योग्यरित्या पाणी पोहचण्यिाकरिता टँकरचा वापर करावा. काही पाण्याच्या टाकीजवळ अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण ताबडतोब काढून घेण्याचे निर्देश शहर अभियंता बारई यांना महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
तसेच संपूर्ण पाण्याच्या टाक्या किती वाजता भरल्या जातात, कंत्राटदाराकडे असणारे कर्मचारी, फिल्टर प्लांट तुकूमच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याचा आढावा महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे योगेश समरीत यांना देण्याचे निर्देश दिले.
पाण्याच्या टाक्या साफ करणे, वॉटर फिल्टर प्लांट साफ करण्याचे निर्देशही कंत्राटदारास दिले. तसेच शहरवासियांना पिण्याचे पाणी योग्य व मूबलक प्रमाणात देण्याचे काम पालिकेचे आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी व कंत्राटदाराने या कामात कुचराई करू नये अशी तंबी देखील महापौर अंजली घोटेकर यांनी दिली आहे.
यावेळी सभापती देवानंद वाढई, सभापती आशा आबोजवार, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेवक सविता कांबळे, वंदना तिखे, शितल कुळमेथे, शिला चौव्हान, ज्योती गेडाम, कल्पना बगुलकर, निलम आक्केवार, आदी उपस्थित होते.