शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

उन्हाळ्यातील विवाह सोहळे दिवाळीत उरकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचा वाढतच असल्याने विवाहोत्सुकांच्या आशेवर पाणी फेरतच राहिले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचे विघ्न : धुमधडाक्यातील सोहळ्यांना मुरड, नागभीड तालुक्यात विवाहाकरिता ८५ अर्ज

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी यंदा विवाह सोहळ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला होता. नागरिकांच्या मागणीवरून ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली. मात्र, धुमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांनी उन्हाळ्यात जुळलेले विवाह पुढे ढकलून दिवाळीत करण्याचा बेत आखला आहे. दरवर्षी तालुक्यात हजारो विवाह पार पडायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे आतापर्यंत विवाह परवानगीसाठी केवळ ८५ अर्ज आले. त्यापैकी ७५ विवाह पार पडले आहेत.शहरी भागात वर्षभर केव्हाही विवाह करण्याची पंरपरा आहे. शहरातील बहुतांश विवाह हे तिथीनुसार नाही तर मंगल कार्यालयाच्या उपलब्ध तारखेनुसार होत असतात. ग्रामीण भागाची संस्कृती वेगळी असल्याने मार्च, एप्रिल व मे महिन्यातच होत असतात. या काळात शेतीची कामे नसतात. जून महिना सुरू झाल्यानंतर डिसेंबर^^-जानेवारी महिन्यापर्यंत शेतीच्या कामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात विवाह सोहळे उन्हाळ्यातच उरकून घेण्याला प्राधान्य दिले जाते. यावर्षीही याच तयारीने अनेकांनी लग्न जुळवून घेतले. अनेकांचे जुळवून घेणे सुरू असतानाच कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचा वाढतच असल्याने विवाहोत्सुकांच्या आशेवर पाणी फेरतच राहिले. अशा परिस्थितीत किती दिवस वाट पाहायचे म्हणून काही जणांनी शासनाच्या नियमांना अधिन राहून विवाह पाडू, अशी हमी देणारे अर्ज सादर करण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत विवाहाची परवानगी मागणारे ८५ अर्ज तहसील कार्यालयात प्राप्त झाले. यातील ७५ अर्जदारांच्या विवाहांना परवानगी देण्यात आली असून १० अर्जदारांची परवानगी शिल्लक आहे.परवानगी अत्यावश्यकनागभीड तालुक्यात मार्च ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजारो विवाह पार पडत असतात. दोन हजार लोकसंख्येच्या गावातही ३० ते ४० विवाह होतात. मात्र यावर्षी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दीला मनाई करण्यात आली. तहसील कार्यालयात विहित नुमन्यात अर्ज व कागदपत्रे सादर केल्यास तहसीलदाराकडून विवाहाला परवानगी दिली जाते.आतापर्यंत ७५ विवाहासाठी परवानगी देण्यात आली आहे. १० अर्ज शिल्लक आहेत. विवाह सोहळ्यात गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- मनोहर चव्हाण,तहसीलदार नागभीड. 

टॅग्स :marriageलग्न