चंद्रपूर जिल्ह्यात विवाहितेची युवकासोबत गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:05 IST2019-07-15T15:05:32+5:302019-07-15T15:05:56+5:30
घुग्घुस तालुक्यातील शेणगाव फाट्याजवळ असलेल्या डांबर प्लान्टजवळ झाडाला एका विवाहित तरुणीसह युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सोमवारी सकाळी आढळून आला.

चंद्रपूर जिल्ह्यात विवाहितेची युवकासोबत गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देआत्महत्येमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: घुग्घुस तालुक्यातील शेणगाव फाट्याजवळ असलेल्या डांबर प्लान्टजवळ झाडाला एका विवाहित तरुणीसह युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सोमवारी सकाळी आढळून आला. सुनिता अमित निले (नकोडा) व राजेश गेडाम अशी या दोघांची नावे आहेत. घटनास्थळी एक दुचाकी वाहनही आढळून आले. ही तरुणी विवाहित असून तिला ६ वर्षांंची मुलगी असल्याचे कळते. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.