सुधीर मुनगंटीवार यांची आज लाडूतुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:41 IST2017-12-29T23:41:07+5:302017-12-29T23:41:26+5:30

स्वरयंत्रावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शनिवारी आपल्या स्वगावी येत आहेत.

Sudhir Mungantiwar's today's Ladutula | सुधीर मुनगंटीवार यांची आज लाडूतुला

सुधीर मुनगंटीवार यांची आज लाडूतुला

ठळक मुद्देजनतेला संबोधित करणार

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : स्वरयंत्रावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शनिवारी आपल्या स्वगावी येत आहेत. आजारातून पूर्णत: बरे झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीने त्यांचा लाडूतुला कार्यक्रम आयोजित केला आहे.
शनिवारी दुपारी २ वाजता चंद्रपुरातील माता महाकालीचे दर्शन घेऊन ते शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे येतील. दुपारी ३ वाजता विश्रामगृहाच्या प्रांगणात त्यांचा लाडूतुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात येणार आहे. या दरम्यान ना. मुनगंटीवार नागरिकांना संबोधित करतील. यावेळी आ. नाना श्यामकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Sudhir Mungantiwar's today's Ladutula