शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:49 IST

Sudhir Mungantiwar BJP, Chandrapur Municipal Election: सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Sudhir Mungantiwar BJP, Chandrapur Municipal Election: विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली. आगामी महापालिका निवडणुकांमध्येही मोठा विजय साकारण्याची मनिषा भाजपा नेत्यांनी बाळगली आहे. पण यादरम्यान भाजपामध्ये विविध स्तरावर अंतर्गत कुरबुरी दिसून येऊ लागल्या आहेत. अनेक महिन्यांपासून राज्यातील भाजपा नेतृत्वावर टीका करणारे भाजपाचेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या काही महिन्यांत ते सातत्याने भाजपा आणि पक्षश्रेष्ठींवर उघडपणे टीका करताना दिसत होते. त्यांच्या नाराजीची उघडपणे चर्चा होत होती. पण आज मात्र त्यांनी वेगळेच मत मांडले.

'आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली', असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वपक्षावर आगपाखड केली होती. नगरपालिका निवडणुकीनंतर मुनगंटीवार यांनी खदखद व्यक्त केल्यानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यानंतर भाजपाने एक मोठा निर्णय घेत आमदार किशोर जोरगेवार यांना महापालिका निवडणूक प्रमुखपदावरून हटवले. महापालिका निवडणूक प्रचार सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याने भाजपने मुनगंटीवारांचे ऐकत त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा रंगली आहे. याच मुद्द्यावर मुनगंटीवार स्पष्ट बोलले.

"मी नाराज कधीच नव्हतो. हा पक्ष माझा आहे. हे घर, हा पक्ष मोठं करण्यात आम्ही रक्त आटवलं आहे. फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं आहे असा दावा करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे," असे म्हणत मुनगंटीवारांनी आयारामांना सुनावले. जोगरवारांना पदावरून हटवल्याबद्दलही मुनगंटीवारांनी उत्तर दिले. "त्यांना जे पद दिलं होतं ते नगरपरिषदेपुरतं होतं. ते महापालिका निवडणुकीचे प्रभारी आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली नव्हती. निवडणुका जिंकणे हा जर पद मिळाल्याचा निकाल असायला हवा असेल तर त्यात दोष दिसल्यास चर्चेतून किंवा संवादातून लक्षात आणून द्यायला हवा. तो दुरुस्त होतो," असे अतिशय सूचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mungantiwar clarifies: Never upset; BJP is my party, outsiders shouldn't claim ownership.

Web Summary : Sudhir Mungantiwar denies being upset, affirming his dedication to BJP. He cautioned against newcomers claiming ownership, addressing internal party dynamics and leadership changes after meeting Fadnavis.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा