सोशल मीडियावर सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवारांचाच बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST2021-08-12T05:00:00+5:302021-08-12T05:00:44+5:30
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम हे लोकप्रतिनिधींच्या जनसंपर्काचे साधन ठरत आहे. जिल्ह्यातील सहा आमदार व दोन खासदार या माध्यमांचा चांगलाच वापर करून घेत आहेत; परंतु माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाच बोलबाला असून, फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत. तर इतरांचे हजारोंच्या जवळपास आहेत. काही आमदारांनी ५०० चा आकडाही पूर्ण केला नसल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवारांचाच बोलबाला
परिमल डोहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात जनसंपर्काचे सर्वात मोठे माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे बघितले जाते. या माध्यमांचा वापर लोकप्रतिनिधीसुद्धा मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसून येते; परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील सहा आमदार व दोन खासदारांपैकी माजी वन तथा अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाच सोशल मीडियावर बोलबाला असल्याचे फेसबुक व ट्विटरच्या फॉलोअर्सवरून दिसून येते.
आपले विचार, भूमिका मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून राजकीय बैठका, सभा, संमेलन यांच्याकडे बघितल्या जायचे; परंतु आता ती जागा सोशल मीडियाने घेतली आहे. सर्वांनाच वापर करता येत असल्याने सोशल मीडिया हा थोरा-मोठ्यांपासून ज्येष्ठांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. लोकप्रतिनिधीही यात मागे नाहीत. त्यामुळेच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम हे लोकप्रतिनिधींच्या जनसंपर्काचे साधन ठरत आहे. जिल्ह्यातील सहा आमदार व दोन खासदार या माध्यमांचा चांगलाच वापर करून घेत आहेत; परंतु माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाच बोलबाला असून, फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत. तर इतरांचे हजारोंच्या जवळपास आहेत. काही आमदारांनी ५०० चा आकडाही पूर्ण केला नसल्याचे दिसून येत आहे.
ट्विटरवर ३०० पेक्षा कमी फॉलोअर्स
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पहिल्या महिला आमदार असणाऱ्या प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोगरेवार यांनी नव्यानेच ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. अकाऊंट ॲक्टिव्ह दिसून येत नाही. आमदार सुभाष धोटे यांचे २०१४ पासून अकाउंट आहे; परंतु तेसुद्धा फारसे ॲक्टिव नाही. या तिघांचे फालोअर्स ३०० पेक्षा कमी असल्याचे दिसून येते.
मुनगंटीवार, वडेट्टीवार, नेते, भांगडीया, धानोरकर, यांच्या अकाऊंटला ब्ल्यू टिक
माजी वने व अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते या तिघांच्याही फेसबुक व ट्विटर अकाउंटला ब्ल्ययू टिक मिळाली आहे. म्हणजेच या तिघांचेही अकाउंट व्हेरिफाईड आहे. यासोबतच खासदार बाळू धानोरकर, आमदार बंटी भांगडिया यांच्या ट्विटर अकाउंटला ब्ल्ययू टिक मिळाली आहे. उर्वरित आमदारांचे व्हेरिफाईड नसल्याचे दिसून येते.