शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

"अशा गोष्टी काँग्रेसमध्ये चालत असतील, भाजपामध्ये...", सुधीर मुनगंटीवार जोरगेवारांवर संतापले, नव्या संघर्षामुळे भाजपाची कटकट वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:17 IST

Sudhir mungantiwar and Kishore jorgewar Controversy: चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या सुरूवातीपासून भाजपातील संघर्ष राज्यात चर्चेत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध दुसऱ्या पक्षातून आलेले आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील हे शीतयुद्ध दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 

Sudhir Mungantiwar vs Kishore Jorgewar : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात पक्षातूनच दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या प्रकारावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नाव न घेता आमदार किशोर जोरगेवार यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, हा प्रकार थेट पक्षशिस्तीचा भंग असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील, असे निश्चित झाले होते. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संगीता खांडेकर यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते.' 

'असे असतानाही भाजपकडूनच सारिका संदुरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. हा प्रकार म्हणजे प्रदेशाध्यक्षांच्या आदेशांचा थेट अवमान असून, पक्षशिस्तीच्या पूर्णतः विरोधात असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर केला. 'अशा गोष्टी काँग्रेसमध्ये चालत असतील; पण भाजपमध्ये नाही. बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही,' असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह

मनपा निवडणुकीपूर्वी उमेदवारांच्या एबी फॉर्म वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप करत मुनगंटीवार म्हणाले, आता महापौर निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत २ उमेदवाराविरोधातच दुसरा उमेदवार उभा करण्यात आला आहे. ही गंभीर बाब असून, यामागे जे कोणी असतील त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणाची पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

"पक्षाने महापौर पदासाठी संगीता खांडेकर आणि उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लावार या दोन निष्ठावंत कार्यकर्त्यांची नावे अधिकृत केलेली आहे. यापैकी खांडेकर यांचा अर्ज रद्द होण्याचे कारण पुढे केले जात आहे. मग एवढीच काळजी होती तर उपमहापौर पदाचाही अर्ज बाद होऊ शकतो. मग दोन अर्ज का दाखल केले नाही. आम्हीही काळजी म्हणून उपमहापौर पदासाठी प्रज्वल कडू यांचा अर्ज दाखल करून ठेवला असता. असे होत नाही", भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

जोरगेवारांनी काय मांडली भूमिका?

मुनगंटीवार यांच्याकडून झालेल्या टीकेला जोरगेवार यांनी उत्तर देत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार जोरगेवार म्हणाले, "संगीता खांडेकर याच महापौरपदाच्या उमेदवार आहेत. छाननीत त्यांचा अर्ज बाद होणार नाही. हे ९९ टक्के खरे आहे. पण, बाद झालाच तर पक्षाची अडचण होऊ नये, याची काळजी म्हणून सविता संदुरकर यांचा नाममात्र अर्ज दाखल करण्यात आला आहे. खांडेकर यांचा अर्ज वैध आहे, असे लक्षात येताच संदुरकर यांचा अर्ज मागे घेतला जाणार आहे. ही बाब पक्षश्रेष्ठींना कळविली आहे. यामध्ये कुठेही पक्षशिस्त भंग पावली नाही."

English
हिंदी सारांश
Web Title : BJP infighting: Mungantiwar slams Jorgewar, party conflict escalates over mayor election.

Web Summary : Chandrapur BJP faces internal strife as a second candidate files for mayor against the official nominee. Mungantiwar criticizes Jorgewar, alleging indiscipline and demanding party action. Jorgewar defends his move as a precautionary measure.
टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारChandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाMayorमहापौर