‘त्या’ वृद्धेला गुरुदेव सेवा मंडळाच्या युवा सेवकांची अशीही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:27+5:302021-06-30T04:18:27+5:30

पती गोरोबा मरण पावल्यापासून बेटूबाई कुंभरे (६५) ही महिला जीर्ण झोपडीवजा घरात एकटीच राहते. तिला एक मुलगा व ...

Such help of Gurudev Seva Mandal's young servants to 'that' old man | ‘त्या’ वृद्धेला गुरुदेव सेवा मंडळाच्या युवा सेवकांची अशीही मदत

‘त्या’ वृद्धेला गुरुदेव सेवा मंडळाच्या युवा सेवकांची अशीही मदत

पती गोरोबा मरण पावल्यापासून बेटूबाई कुंभरे (६५) ही महिला जीर्ण झोपडीवजा घरात एकटीच राहते. तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. मात्र मुलगा बाहेरगावी कोसोदूर राहतो. मुलगीसुद्धा तिच्या सासरी राहते. त्यामुळे बेटूबाईला सध्यातरी कुणाचाही आधार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सेवक असलेल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांना सदर बाबीची माहिती मिळाली. त्यांनी स्वतःच्या पैशाने बेटूबाईंच्या घरावर ताडपत्री व प्लास्टिक कापड टाकून दिले. आता पावसापासून त्यांचा बचाव होणार आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मधुकर टिकले, उमेश भानारकर, समीर थेरकर, चेतन टिकले आदींचा समावेश आहे.

Web Title: Such help of Gurudev Seva Mandal's young servants to 'that' old man