कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:30 IST2021-04-28T04:30:56+5:302021-04-28T04:30:56+5:30

चंद्रपूर : शहरातील डॉ. पी. संगीता व डॉ. निशिकांत टिपले यांनी नुकताच एका ५५ वर्षीय कोरोना रुग्णावर मंगळवारी प्लाझ्मा ...

Successful experiment of plasma therapy on corona patient | कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा यशस्वी प्रयोग

कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा यशस्वी प्रयोग

चंद्रपूर : शहरातील डॉ. पी. संगीता व डॉ. निशिकांत टिपले यांनी नुकताच एका ५५ वर्षीय कोरोना रुग्णावर मंगळवारी प्लाझ्मा थेरपीचा यशस्वी प्रयोग केला. विशेष म्हणजे, थेरपीनंतर पाच तासातच रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. जिल्ह्यातील पहिलीच यशस्वी प्लाझ्मा थेरपी असल्याचा दावाही डॉ. निशिकांत टिपले यांनी केला आहे.

सरकारनगर येथील डॉ. पी. संगीता व डॉ. टिपले यांच्या कोविड रुग्णालयात चार दिवसांपूर्वी ५५ वर्षीय कोरोनाबाधित उपचाराकरिता दाखल झाला होता. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने ऑक्सिजनयुक्त बेडवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांनी व्हेंटिलेटर बेड्स मिळावे यासाठी अन्यत्र धावपळ सुरू केली. दरम्यान, डॉ. निशिकांत टिपले यांनी या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चंद्रपूर शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातून प्लाझ्मा घेण्यात आला. या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. त्यानंतर पाच ते आठ तासांच्या आत रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. येत्या आठवडाभरात रुग्ण पूर्णपणे बरा होईल, असा विश्वास डॉ. निशिकांत टिपले यांनी व्यक्त केला आहे. या थेरपीसाठी डॉ. शिल्पा टिपले, डॉ. तोतडे, डॉ. हर्षल डॉ. साई, डॉ. सिद्धी आदींनी मोलाचे सहकार्य केले.

कोट

चार दिवसांपूर्वी ५५ वर्षीय रुण कोरोनाच्या उपचाराकरिता आमच्या रुग्णालयात दाखल झाला होता. रेमडेसिविर इंजेक्शन देऊनही रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आम्ही प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय घेतला. प्लाझ्मा थेरपी केल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत मोठी सुधारणा दिसून येत आहे.

-डॉ. निशिकांत टिपले, चंद्रपूर

Web Title: Successful experiment of plasma therapy on corona patient