शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Admission Document Checklist: दहावी-बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनो पुढे ऍडमिशन घेण्यासाठी आत्ताच काढून ठेवा 'ही' कागदपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:27 IST

Important Admission Documents: निकालानंतर पालकांसह विद्यार्थ्यांची होते घाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर आता बारावीचा निकालही लागला आहे. त्यामुळे पुढील वर्गातील प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांची गडबड सुरू होते. कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा झाल्यास त्याला दाखले, कागदपत्रे लागतातच. प्रवेशाची प्रक्रिया सुरू होताना अनेक विद्यार्थी कागदपत्रे, दाखल्यांबाबत संभ्रमात असतात. कधी-कधी महत्त्वाची कागदपत्रे राहून जातात, तर कधी काही महत्त्वाची माहिती भरणेही राहून जाते. 

अनेकदा प्रवेशावेळी दाखल्यांची गडबड होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे आतापासून काढायला सुरुवात केल्यास विद्यार्थी-पालकांची प्रवेशावेळी होणारी धावपळ कमी होईल. विविध दाखल्यांसाठी प्रशासकीय वेळ लागतात, त्यामुळे पूर्वीच दाखवे काढून ठेवणे केव्हाही चांगले. 

धावपळ टाळता येऊ शकतेविद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दहावी-बारावीची मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, निवासी पत्त्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र ही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. अनेकवेळा निकालानंतर किंवा प्रवेशाच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांसह पालक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करतात. अनेक विद्यार्थी कागदपत्रे, दाखल्यांबाबत संभ्रमात असतात. कधी-कधी महत्त्वाची कागदपत्रे राहून जातात. 

ही कागदपत्रे आवश्यक

  • डोमिसाइल-डॉगरी दाखल्यासाठी...

तलाठ्यांचा रहिवासी दाखला, आधारकार्डची झेरॉक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाइड, जन्माचा दाखला.

  • उत्पन्नाच्या दाखल्यासाठी...

तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला, आधारकार्डची झेराक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, वडिलांचा फोटो

  • जातीच्या दाखल्यासाठी...

तलाठी-सरपंच यांचा दाखला, मुलाचा व वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थी व वडिलांचे आधारकार्ड, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला.

  • राशनकार्ड काढण्यासाठी..

तलाठी-सरपंच यांचा दाखला, वडिलांचा उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, गॅस सिलिंडरचे कागदपत्र, कुटुंबप्रमुखाचे दोन फोटो.

प्रवेश अर्ज भरताना ही घ्या काळजी...

  • कोणत्या शाईचे पेन वापरावे, कोणत्या भाषेत अर्ज भरावा, या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. त्यानंतर योग्य पद्धतीने अर्ज भरावा.
  • प्रवेशासाठीचा अर्ज भरताना गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत ठेवावे. ऑफलाइन अर्ज भरताना अर्जासोबत कागदपत्रे जोडण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीही सोबत असाव्यात.
  • अर्ज भरताना काही चूक होऊ नये, यासाठी तुम्ही आधी अर्जाची झेरॉक्स कॉपी काढून ती भरू शकता आणि त्यानंतर मूळ अर्ज भरा. ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून एका फोल्डरमध्ये किंवा पेनड्राइव्हमध्ये घेऊन सोबत ठेवा.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरEducationशिक्षणCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन