विद्यार्थ्यांनी प्रत्येक आव्हानांना सामोरे जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:37+5:302021-02-05T07:41:37+5:30
राज्य अभ्यासक्रम व १० वी बोर्ड परीक्षेला आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाण्यासाठी सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्याकरिता विद्यार्थ्यांच्या कृतीपत्रिकेबाबत असलेल्या अडचणी, शंकांचे ...

विद्यार्थ्यांनी प्रत्येक आव्हानांना सामोरे जावे
राज्य अभ्यासक्रम व १० वी बोर्ड परीक्षेला आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाण्यासाठी सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्याकरिता विद्यार्थ्यांच्या कृतीपत्रिकेबाबत असलेल्या अडचणी, शंकांचे निरासन व्हावे याकरिता शालेय गुणवत्ता विकासांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर व शिक्षण विभाग (माध्य.) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय विषयनिहाय कृतीपत्रिका आधारित मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले, शिक्षणाधिकारी (माध्य.) उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद कन्या प्रशाला, परभणीचे माध्यमिक शिक्षक श्रीपाद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रल्हाद खुणे, संचालन कल्पना बन्सोड यांनी केले. कार्यक्रमासाठी अधिकारी, विषय सहाय्यक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.