विद्यार्थ्यांनो, सेवाभावी वारसा जपा

By Admin | Updated: September 2, 2015 00:42 IST2015-09-02T00:42:19+5:302015-09-02T00:42:19+5:30

येथे नव्यानेच स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाला मंगळवारी विद्यार्थ्यांच्या उत्साहात सुरुवात झाली.

Students, check the charitable heritage | विद्यार्थ्यांनो, सेवाभावी वारसा जपा

विद्यार्थ्यांनो, सेवाभावी वारसा जपा

दीपक म्हैसेकर : वैद्यकीय महाविद्यालयाचे सत्र सुरू

चंद्रपूर : येथे नव्यानेच स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाला मंगळवारी विद्यार्थ्यांच्या उत्साहात सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे ‘विंग्ज आॅफ फायर’ हे पुस्तक देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. चंद्रपूर जिल्हयाला रुग्णसेवेचा वारसा असून वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात हा वारसा जपावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी छोटेखानी स्वागत समारंभात केले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, प्रो.डॉ. संजय कुबडे, प्रो.डॉ. वाय.आर. कुळकर्णी, प्रो.डॉ.अभय हात्तेकर, डॉ. शैलेंद्र धवने, डॉ.एम.व्ही. बिमनपल्ली, आयएमएचे अध्यक्ष डॉ.अशोक भुक्ते, डॉ.अनंत हजारे, डॉ.मंगेश गुलवाडे यावेळी उपस्थित होते. भारतीय वैद्यकीय परिषदेने परवानगी दिल्यानंतर चंद्रपूर येथे आजपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम सत्रास सुरुवात झाली आहे. पहिल्या वर्षात ८५ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला असून यात ४३ विद्यार्थींनी व ४२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एमबीबीएसचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम या महाविद्यालयात शिकविण्यात येणार आहे. त्याचबरोबर थेअरीसाठी ७५ टक्के तर प्रात्यिक्षकांसाठी ८० टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, हे महाविद्यालय नवीन असल्याची शंका मनातून काढून टाका. या ठिकाणी सर्व सुविधा देण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला आहे. काही त्रुटी असल्यास प्रशासनाच्या नजरेस आणून दयाव्यात, असेही ते म्हणाले.

Web Title: Students, check the charitable heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.