शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची दुचाकीला धडक

By admin | Updated: June 13, 2014 00:00 IST

नागपूरहून ब्रह्मपुरी मार्गे गडचिरोलीकडे जाणाऱ्या एसटीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

ब्रह्मपुरी : नागपूरहून ब्रह्मपुरी मार्गे गडचिरोलीकडे जाणाऱ्या एसटीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. अहेरी आगाराची नागपूर-अहेरी बस (क्रमांक एम.एच. १४ बी.टी. १६७५) नागपूरहून ब्रह्मपुरीमार्ग अहेरीकडे सकाळी ११ जात होती. लकडा स्टॉलजवळ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चालकाच्या उजव्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला घासत जाऊन बसने दुचाकीला (क्र. एम.एच. ३१ बी.एम. ६६३० ) जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसच्या समोरील भागाखाली दुचाकी चालकासह येऊन दुचाकी चालक रुपेश ताडीराम गुरनुले (२२) गंभीर जखमी झाला. येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आल्याचे समजते. बसचालकाने घटनेनंतर पळ काढीत पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पुढील कारवाई सुरू आहे. सदर मार्गावर नेहमीच वर्दळ असते व अनेक वाहनांची ये- जा सुरू असते. या मार्गावर आजपर्यंत अनेक अपघात घडले असल्याने सदर मार्गावर गतिरोधक तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी जनतेकडून होत आहे. (वार्ताहर)