पाण्यासाठी मनपावर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:44 IST2018-09-28T22:43:51+5:302018-09-28T22:44:16+5:30
शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढला. एक आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा नियमित न केला नाही तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

पाण्यासाठी मनपावर धडक मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढला. एक आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा नियमित न केला नाही तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
उन्हाळ्यापासून सुरु असलेले जलसंकट मनपाच्या बेजबाबदारपणामूळे पावसाळ्यातही कायम आहे. इरई धरणात मुबलक पाणीसाठा असूनही दोन दिवसाआड पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात जैन भवनापासून झाली.
मोर्चेकरी मनपा कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर सत्ताधारी पदाधिकाºयांविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, एक आॅक्टोबरपासून शहरातील पाणी पूरवठा नियमीत करु, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. आंदोलनात विनोद अनंतवार, रुपेश पांडे, सुनील पाटील, इरफान शेख, प्रकाश चंदनखेडे, राशीद हुसैन, अब्बास, वंदना हातगावकर, संतोषी चव्हाण, दुर्गा हातगावकर, राजेश मांगुळकर, सुधीर माजरे, दिपक पद्मगीरीवार, पंकज चिमुरकर, इमरान खान, प्रणीत वडपल्लीवार, मुन्ना जोगी, टिकाराम गावंडे, पुष्पा प्रसाद, पंकज दीक्षित, विलास सोमलवार उपस्थित होते.