अट्टल दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST2021-06-25T04:21:08+5:302021-06-25T04:21:08+5:30

ऋशेष चंद्रभान आत्राम (वय २२, रा. विसापूर) असे अटकेतील दुचाकी चोरट्याचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या ...

A strong two-wheeler thief was handcuffed | अट्टल दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या

अट्टल दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या

ऋशेष चंद्रभान आत्राम (वय २२, रा. विसापूर) असे अटकेतील दुचाकी चोरट्याचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात भिवापूर वाॅर्डातील जुना बेनार चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, संजय आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी या कर्मचाऱ्यांचे पथक रामनगर आणि शहर पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरट्यांच्या शोधमोहिमेसाठी गस्तीवर होते. विसापूर येथील एक युवक एमएच ३४ एआर २७४८ क्रमांकाची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन दुचाकीसह युवकाला ताब्यात घेतले.

आरोपीने सावली येथून दोन, भद्रावती आणि रामनगर पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

Web Title: A strong two-wheeler thief was handcuffed