कोरोना पार्श्वभूमीवर सिंदेवाही व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:00+5:302021-04-10T04:28:00+5:30

सिंदेवाही : कोरोना चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचे संभाव्य संक्रमण कमी करण्यासाठी सिंदेवाहीत कडकडीत ...

Strictly closed by Sindevahi merchant establishment on Corona background | कोरोना पार्श्वभूमीवर सिंदेवाही व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद

कोरोना पार्श्वभूमीवर सिंदेवाही व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद

सिंदेवाही : कोरोना चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचे संभाव्य संक्रमण कमी करण्यासाठी सिंदेवाहीत कडकडीत बंद पाळण्यात आला.

हा बंद कोरोना पार्श्वभूमीवर येथील नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन तथा तहसीलदार यांच्या पुढाकाराने स्वयंस्फूर्तीने पाळण्यात आला. काही दिवसांपासून तालुक्यात नियमित कोरोनाबाधित रुग्णात वाढ होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात जवळपास १३० रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. अजूनही शहरात रुग्णांची संख्या वाढतच असल्याने आजाराचा संभाव्य संसर्गाचा धोका टाळण्यासाठी येथील नगर पंचायत, पोलीस विभाग, तहसील प्रशासन नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती आहे. शासनाच्या ब्रेक द चेन आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत जमावबंदी नियम लागू करण्यात आला आहे. नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाईदेखील केली आहे.

Web Title: Strictly closed by Sindevahi merchant establishment on Corona background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.