शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्ह्यातील ५२ चेकपोस्टवर कडक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

गावातील प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावातील बचत गट सक्रिय झाले असून मास्कसोबतच साबणाचेदेखील वाटप केले जात आहे. याशिवाय निर्जंतुकीकरण प्रक्रिया, हात स्वच्छ धुणे, मास्क कसे वापरायचे याबाबतचेदेखील समुपदेशन केले जात आहे. गावागावातील शाळांमध्ये आवश्यकता पडल्यास बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१८३६ गावात जनजागृती : आरोग्य तपासणी पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील १८३६ गावांमध्ये कोरोना संदर्भात मोठया प्रमाणात जनजागृती सुरू आहे. त्यातही सीमावर्ती भागामध्ये तेलंगाना राज्य, नागपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून कोणीही सीमांमध्ये येऊ नये, चुकून गावात आल्यास त्यांना क्वारंटाईन करणे, गावांमध्ये येणाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय याशिवाय जिल्ह्यातील ५२ चेकपोस्टवर २४ तास आरोग्य पथक तैनात असून प्रत्येकाची तपासणी याठिकाणी केली जात आहे.गावागावात फवारणी करणे, ग्रामपंचायत स्तरावर समिती स्थापन करणे, गावात साबण वाटप करणे, हात धुण्याचे महत्त्व पटवून देणे, गावात पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, गावांमधील असंघटित मजुरांची माहिती घेणे, गावातील असंघटित मजुरांसाठी धान्य उपलब्ध करणे, परराज्यातील व अन्य मजुरांची राहण्याची व्यवस्था करणे, जिल्हा व तालुका कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू पुरवठादार यांची यादी प्रसिद्ध करणे, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राखणे, गावांमध्ये स्वच्छता करणे आदी १७ घटकांची पूर्तता प्रत्येक गावाला करणे आवश्यक आहे. याशिवाय आरोग्यविषयक सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. गावागावात उपलब्ध करून देण्यात आलेल्या मेगाफोनवरून कोरोना संदर्भात रोज नव्या सूचनांची दवंडी जिल्ह्यातील गावागावांमध्ये दिल्या जात आहे.जिल्ह्यातील ५२ चेक पोस्टवर २४ तास आरोग्य पथक तैनात असून प्रत्येकाची तपासणी याठिकाणी केली जात आहे. पोलिसांकडून कोणालाच प्रवेश दिला जात नाही. परवानगी घेऊन गेलेल्यांचीदेखील तपासणी करूनच त्याला आतमध्ये सोडल्या जात आहे. तसेच प्रत्येक चेक पोस्टवर निर्जंतुकीकरण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. बाहेरून मालवाहतूक वा अन्य काहीही वाहतूक करणाºया वाहनांचेदेखील निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.११ लाखांचा दंडनियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील १९८ प्रकरणात एकूण ११ लाख ७३ हजार २७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या ५८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर ७१४ वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सूचनांचे उल्लंघन करणाºयांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.ग्रामीण भागातही मास्क अनिवार्यगावातील प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावातील बचत गट सक्रिय झाले असून मास्कसोबतच साबणाचेदेखील वाटप केले जात आहे. याशिवाय निर्जंतुकीकरण प्रक्रिया, हात स्वच्छ धुणे, मास्क कसे वापरायचे याबाबतचेदेखील समुपदेशन केले जात आहे. गावागावातील शाळांमध्ये आवश्यकता पडल्यास बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी चार दिवसांपर्यंत गरज पडल्यास क्वारंटाईन केले जाते.आरोग्य सेतु अ‍ॅपजिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असलेले आरोग्य सेतू अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड करावे. यात सोपे चार प्रश्न नागरिकांना विचारले जातील. आपण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहोत की असुरक्षित, हे या अ‍ॅपमध्ये कळते. तसेच देशातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेता येते. एकप्रकारे या अ‍ॅपद्वारे आपण स्वत:चे डॉक्टर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे अ‍ॅप त्वरित डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.११२ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ८५ नागरिकांची नोंद करण्यात आली. ७७ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७६ नमुने निगेटीव्ह निघाले आहेत. एका नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या ३० हजार ७२५ आहे. यापैकी दोन हजार ५२४ नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २८ हजार २०१ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ११२ आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या