वादळी पावसाचा जिल्ह्यातील अनेकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:35+5:30

चंद्रपुरात रात्री ९ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. वीज ताराही तुटल्या. त्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. घुग्घुससह नकोडा येथील झाडे कोसळली. त्यामुळे ठिकठिकाणी वीज प्रवाहित तारा तुटल्या. काही ठिकाणी वीज खांबही वाकले. त्यामुळे घुग्घुस येथील वीज पुरवठाही खंडित होता.

Stormy rain hit many in the district | वादळी पावसाचा जिल्ह्यातील अनेकांना फटका

वादळी पावसाचा जिल्ह्यातील अनेकांना फटका

Next
ठळक मुद्देझाडे कोसळली, टिनाही उडाल्या : अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. या पावसामुळे अनेक मार्गावरील झाडे कोसळली. काही घरांच्या टिना उडाल्या. रबी पिकांचेही मोठे नुकसान झाले.
चंद्रपुरात रात्री ९ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. वीज ताराही तुटल्या. त्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. घुग्घुससह नकोडा येथील झाडे कोसळली. त्यामुळे ठिकठिकाणी वीज प्रवाहित तारा तुटल्या. काही ठिकाणी वीज खांबही वाकले. त्यामुळे घुग्घुस येथील वीज पुरवठाही खंडित होता.
नागभीड तालुक्यात मोठया प्रमाणात गहु, चना पिकांचे उत्पादन घेतले जाते. सोमवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या शेतातील गहु व चना पिंकाचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोना विषाणूची दहशत तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका, यामुळे शेतकरी, शेतमजुरांना मोठया संकटातून जावे लागत आहे.भिसी व परिसरात रविवार व सोमवारी मध्यरात्री वादळी वाºयासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले चना व गव्हाचे पीक ओले झाले व बरेच नुकसान झाले. वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची भीती उदभवू लागली आहे. अशावेळी नागरिकांनी स्वत:च्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
 
Web Title: Stormy rain hit many in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस