शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे सर्व कर्मचारी संपावर

By admin | Updated: December 15, 2015 02:33 IST

वारंवार मागण्यांच्या पूर्तता करण्याबाबत आयुक्तांना निवेदन देऊनही आयुक्तांनी दखलच न घेतल्याने अखेर

चंद्रपूर : वारंवार मागण्यांच्या पूर्तता करण्याबाबत आयुक्तांना निवेदन देऊनही आयुक्तांनी दखलच न घेतल्याने अखेर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला. सोमवारी एकही कर्मचारी महापालिकेत कामावर रुजू झाला नाही. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. विविध कामासाठी आलेले अनेक नागरिक महापालिकेतून आल्या पावली परत जाताना दिसले. सदर आंदोलन भारतीय नगरपरिषद कामगार संघाच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर महानगरपाालिकेतील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याबाबत मागील एक वर्षापासून या संघटनेकडून सातत्याने मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मनपा प्रशासनाच्या हेकेखोर धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या १४ मागण्यांपैकी एकही मागणीची प्रशासनाकडून पुर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय नगरपरिषद कामगार संघाच्या नेतृत्वात १४ नोव्हेंबर २०१५ पासून मनपा कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलेले होते व त्याबाबत मनपा प्रशासनाला कळविलेसुद्धा होते. त्यानंतरही आयुक्तांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. किंवा या संदर्भात साधी चर्चा करण्याचे सौजन्यही दाखविले नाही.दरम्यान, ३० नोव्हेंबर २०१५ ला संघटनेने मनपा प्रशासनाला रितसर बेमुदत संपाची नोटीस बजावण्यात आली व त्यामध्ये ११ डिसेंबर २०१५ पर्यंत कर्मचाऱ्यांचा मागण्याची पुर्तता न झाल्यास १४ डिसेंबर २०१५ ला शुन्य तासापासून संपूर्ण कर्मचारी बेमुदत संपावर जाणार, असे मनपा प्रशासनाला सूचित करण्यात आलेले होते. ११ डिसेंबर २०१५ पर्यंत मनपा प्रशासनाकडून कोणतीही मागणीची पूर्तता न झाल्यामुळे त्याच दिवशी भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शैलेश मुंजे, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश असरेट यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता द्वारसभा घेण्यात आली. सदर द्वारसभेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची सविस्तर माहिती उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर द्वारसभेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची सविस्तर माहिती उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर संपात सतिश असरेट यांनी पाठिंबा दर्शवून सर्व सफाई कामगारांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.वारंवार निवेदन देऊनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याच सकारात्मक हालचाली होत नसल्याने आता मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन तिव्र करण्याची पूर्ण तयारी केलीे. दरम्यान, ठरल्याप्रमाणे आज महानगरपालिकेतील सर्व विभागातील कर्मचारी कामावर रुजू झाले नाही. त्यामुळे महापालिकेतील दैनंदिन कामाचा बोजवारा उङाला. महानगरपालिकेत नेहमीच नागरिकांची विविध कामांसाठी रेलचेल सुरू असते. आज सोमवाहीही अनेक नागरिक विविध कामांसाठी महापालिकेत आले. मात्र कर्मचारीच नसल्याने नागरिकांना आल्यापावलीच परत जावे लागले. आणखी काही दिवस या कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहिल्यास नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच शहर व्यवस्थापनात गैरसोयही निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर महानगर पालिका काय उपाययोलना करणार हे अद्याप कळलेले नाही. (शहर प्रतिनिधी)पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली४मनपा कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर जाणार, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कळताच त्यांनी तात्काळ रविवारी रात्री १० वाजता विश्रामगृहात बैठक बोलाविली. बैठकीला महापौर, आयुक्त, झोन सभापती अंजली घोटेकर, संघटेनेतर्फे सुरेश आंबेकर, तुकड्यादास डुमरे, सारंग निर्मळे, संजय टिकले, भाऊराव सोनटक्के, सचिन माकोडे उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर आयुक्तांनी १४ मागण्यांपैकी पाच मागण्यांची पूर्तता १४ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत करण्याचे आश्वासन दिले. मात्र ६ वाजेपर्यंतही एकही मागणी पूर्ण झाली नव्हती.महापौरांच्याही सूचनांकडे दुर्लक्ष४संप मागे घ्यावा, यासाठी महापौर राखी कंचर्लावार व उपमहापौर वसंत देशमुख यांनी आज सोमवारी सायंकाळी ४ वाजता पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले. महापौर व उपमहापौर यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सहानभुतीपूर्वक आजच निकाली काढा, अशा सूचना दिल्या. मात्र आयुक्त त्यांचेही ऐकण्यास तयार नव्हते. सोमवारी संपाच्या पहिल्या दिवशी १०० टक्के कामगार संपावर होते. मागण्या मान्य न झाल्यास संप बेमुदत सुरू राहील व नागरिकांच्या गैरसोयीबद्दल स्वत: आयुक्त जबाबदार असतील.- शैलेश मुंजे, जिल्हाध्यक्ष, भारतीय नगरपरिषद कामगार संघ, चंद्रपूर