पाकडीगुड्डम धरणाचे पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला देणे बंद करा
By Admin | Updated: July 10, 2017 00:25 IST2017-07-10T00:25:27+5:302017-07-10T00:25:27+5:30
तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पकडीगड्डम येथे शेतकऱ्यासाठी धरण बांधन्यात आले.

पाकडीगुड्डम धरणाचे पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला देणे बंद करा
खुशाल बोंडे : आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपणा : तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पकडीगड्डम येथे शेतकऱ्यासाठी धरण बांधन्यात आले. मात्र धरणाचे पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला विकण्यात आले. तेव्हापासून मोजके पाणी शेतकऱ्यांना दिले जाते. तर पूर्ण पाणी अंबूजा सिमेंट कंपनीला पुरवले जाते.
पावसाळ्याला सुरुवात होऊन दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र धरणात काहीच पाणी शिल्लक नाही, जर अशीच परिस्थिती राहिली, तर पाण्याचा मोठा दुष्काळ पडण्याची भीती आहे.
त्यामुळे अंबूजा सिमेंट कंपनीला पाणी देण्याचे टाळावे अशी मागणी विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे यांनी केली आहे.
मागील ३० ते ३५ वर्षापूर्वी सरकारने कवडीमोल भावाने जमिनीची खरेदी केली. त्याचा योग्य मोबदलाही त्यांना दिला नाही. तसेच प्रकल्पग्रस्तांंना नोकरी दिली नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
याची योग्य चौकशी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे पाणी अंबूजा कंपनीला देण्यात येऊ नये, पाणी देणे बंद करण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्ताना त्यांच्या जमिनीचा मोबादला देण्यात यावा, त्यांना नोकरी देण्यात यावी, त्यासोबतच इतर सोई सुविधा देण्यात याव्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपाचे कोरपणा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, भाजपाचे महामंत्री मनोहर कुळसंगे, भाजपा तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, भाजपा कार्यकर्ते प्रल्हाद पवार, माजी सरपंच नागोराव सिडाम, रमेश बोबडे, चंदू उईके, आडकू मडावी, राजू सिडाम, मंगूजी सिडाम व प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आहे