समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:27 AM2021-04-10T04:27:25+5:302021-04-10T04:27:25+5:30

पिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यात अनेक आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (उपकेंद्रांमध्ये) समुदाय आरोग्य अधिकारी, आशा वर्कर्स व कामगार कार्यरत असून, ग्रामीण ...

Stop the injustice done to community health officials | समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा

googlenewsNext

पिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यात अनेक आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (उपकेंद्रांमध्ये) समुदाय आरोग्य अधिकारी, आशा वर्कर्स व कामगार कार्यरत असून, ग्रामीण भागातील रुग्णांना अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करत आहेत. सध्याच्या कोरोना काळात रुग्ण तपासणी, पूरग्रस्त भागात जाऊन आरोग्य सेवा पुरविणे, कोविड केंद्रातील कामे, कोविड लसीकरण इत्यादी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. मात्र, त्यांना मानधन पाहिजे तसे दिले जात नाही. हा अन्याय थांबवावा, अशी मागणी सीएचओने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार आरोग्य अधिकाऱ्यांना दरमहा पंधरा हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देय असतो. सदर भत्ता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांना पूर्णपणे दिल्या जात आहे. परंतु ब्रह्मपुरी तालुक्यातीलच समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना त्यातील अत्यल्प मानधान दिले जात आहे. ही गंभीर बाब समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वारंवार आणून दिली. मात्र, त्यांच्याकडून नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच त्यांच्या कार्याचे मूल्यमापन अयोग्य पद्धतीने होऊन नकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे जात आहे.

यामुळे या अधिकाऱ्यांमध्ये निराशा वाढीस लागली आहे. संबंधित विभागाने सदर प्रकरणाची त्वरित दखल घेत तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या हक्काचा मोबदला प्राप्त करुन देऊन न्याय द्यावा, अशी मागणी ना. वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. यावेळी तालुक्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आशा वर्कर्स, तथा संबंधित कामगार उपस्थित होते.

Web Title: Stop the injustice done to community health officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.