शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.35% मतदान
3
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
4
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
5
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
6
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
8
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
9
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
10
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
11
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
12
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
13
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
14
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
15
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
16
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
17
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
18
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
19
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
20
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका

दगडी पाटा, वरवंटा ग्रामीण भागाचा मिक्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो.

ठळक मुद्देकांडलेल्या वस्तुंची चव न्यारी, लॉकडाऊनमुळे पाथरवटांचे नुकसान

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : जुन्या काळात प्रत्येक घरात अत्यावश्यक असलेल्या पाट्याची जागा आता शहरी भागात 'मिक्सर' या आधुनिक उपकरणाने घेतली. मात्र, ग्रामीण भागात अद्याप पाट्याचे अस्तित्व कायम आहे. यातून बऱ्याच कुटुंबांची उपजिविकाही सुरू असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो. तालुक्यातील बाम्हणी येथील काही पाथरवट या पाट्यांची निर्मिती करून ते आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. एका पाट्याची किंमत तीनशे ते सहाशे रूपयांपर्यंत असते. लॉकडाऊनमुळे पारंपरिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाथरवटांचा पाटा निर्मिती हा एकमेव नसला तरी यातून कुटुंबाला हातभार मिळतो. एक पाथरवट वर्षाला सुमारे २५ ते ३० हजार रूपये मिळवितो. बाम्हणी येथे असे पाच सहा पाथरवट आहेत. पाट्यावर आजही मसाल्याचे पदार्थ वाटल्या जातात. नागभीड शहर व ग्रामीण भागात तर विविध पदार्थ वाटण्यासाठी पाट्याचाच वापर होतो. शहरातील काही कुटुंब तर मिक्सरपेक्षा पाट्यावर वाटलेल्या जिन्नसांना विशेष पसंती देतात. 'टाचविण्यातूनही मिळतो रोजगारनेहमीच्या वापराने पाट्यावर पदार्थ वाटण्याची प्रक्रिया त्रासदायक असते. त्यामुळे पाट्याला टाचवून घ्यावे लागते. हे काम काही व्यक्ती करतात. यातूनही या पाथरवटांना थोडा रोजगार मिळतो. पाटा टाचवणारे पाथरवट गावागावात फिरून ‘आहे का पाटा टाचवायचा’ अशी हाक देत असतात. पाटा टाचविण्यासाठी ५० ते ६० रूपये असा दर असल्याची माहिती कारागीरांनी दिली.पारंपरिक व्यवसायाची उपेक्षादगडांपासून विविध वस्तु तयार करणाºया जमातींची संख्या बरीच कमी आहे. काळाच्या स्पर्धेत हा व्यवसाय मागे पडल्याने पारंपरिक कारागीर नवीन व्यवसाय स्वीकारत आहेत. यातून केवळ कुटुंबांचा कसाबसा उदरनिर्वाह करता येऊ शकतो. शासनाकडून या व्यवसायाला आर्थिक पाठबळ नाही. महागाई वाढल्याने या अल्प उत्पनातून कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे शासनाने अशा कारागीरांसाठी योजना सुरू करण्याची मागणी पाथरवटांनी केली आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक