रस्त्याच्या कामात चोरीचा मुरुम

By Admin | Updated: April 29, 2015 01:18 IST2015-04-29T01:18:09+5:302015-04-29T01:18:09+5:30

नांदा ते राजुरगुडा या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पूरग्रस्त निधीतून पाच लाख रुपये खर्चून करण्यात येत आहे.

Stolen pimple on the road | रस्त्याच्या कामात चोरीचा मुरुम

रस्त्याच्या कामात चोरीचा मुरुम

चंद्रपूर : नांदा ते राजुरगुडा या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पूरग्रस्त निधीतून पाच लाख रुपये खर्चून करण्यात येत आहे. मात्र या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या लाल मातीमिश्रीत चोरीच्या मुरुमाचा वापर होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
या कामाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ठेकेदार इस्टिमेटनुसार काम करीत नसून त्यातून जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंत्याचेही चांगलेच फावत आहे. या अगोदरचसुद्धा नांदा- पिंपळगाव या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. २० लाख रुपयांच्या पूरग्रस्त निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या क्षेत्राच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सरोज मुनोत यांना गावकऱ्यांनी या कामाबाबत कल्पना दिली असता त्यांनीसुद्धा २१ एप्रिलला रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या कामात दोष आढळून आल्याने सदर कंत्राटदारावर कारवाई मागणी केलेली आहे.
नांदा ग्रामपंचायत ही पेसाअंतर्गत येते. या ठिकाणी नाल्यातून रेतीचे व लाल मातीचे अवैधरीत्या उत्खनन होत आहे. मात्र सरपंच व सचिवाच्या दुर्लक्षतेमुळे ग्रामपंचायतीचे नुकसान होत आहे. (शहर प्रतिनिधी)

रस्त्याला सिमेंटीकरणाची प्रतीक्षा

गडचांदूर : माणिकगड सिमेंट कंपनी प्रवेशद्वार ते पेट्रोलपंप चौक तसेच रेल्वे क्रॉसिंग ते सावित्रीबाई फुले महाविद्यालय चौक पावेतो रस्ता रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून केली जात आहे. मात्र दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला खड्डे पडले आहे. या रस्त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. दोन्ही बाजूला ट्रकच्या रांगा असतात. त्यामुळे नेहमी अपघात होतात. औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. शहरात माणिकगड सिमेंट उद्योग असून त्याचाच विस्तारित दुसरा प्रकल्प पूर्ण झाला आहे. जवळच अंबुजा, अल्ट्राटेक, मुरली सिमेंट प्रकल्प आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन सिमेंट ट्रक, कोळसा ट्रक व इतर वाहने दिवसरात्रं जात असतात नागरिकांची वर्दळसुद्धा याच मार्गाने असते. या रस्त्यावर आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शनिवार दोन तरुणांना जीव गमवावा लागला. या रस्त्याचे चौपदरीकरण करुन सुशोभिकरण करण्याची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व माणिकगड सिमेंट कंपनी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यास तयार आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग परवानगी देत नसल्याने हे काम रखडले आहे. माणिकगड ने या रस्त्याने अंदापत्रक शासनाकडे पाठविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे असे आहे की, कंपनीने शासनाकडे रक्कम जमा करावी त्यानंतर सा.बां. विभाग रस्त्याचे काम करेल. या दोघांच्या वादात गडचांदूरकरांचे हाल होत आहेत. या परिसरातील लोकप्रतिनिधींनी यांनी याकडे लक्ष देऊन रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Stolen pimple on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.